नांदेड| किमान आधारभूत किंमत खरेदीअंतर्गत हंगाम 2020-21 मध्ये हमीभावाने 5 हजार 230 रुपये प्रति क्विंटल चणा खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात नांदेड (अर्धापूर), मुखेड, हदगाव, लोहा, किनवट, बिलोली (कासराळी), देगलूर, जाहुर (ता. मुखेड), किनवट (गणेशपूर) या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत चणा ऑनलाईन शेतकरी नोंदणी 16 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे.
शेतकरी बांधवानी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील चणा या पिकांचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व बँकपासबूक इत्यादी कागदपत्रे तालुक्यातील खरेदी केंद्रावर देवून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.