केंद्र व राज्य सरकारने महाराष्ट्रातील तमाशा बंद करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे -ॲड रेवण भोसले -NNL


उस्मानाबाद|
महाराष्ट्रात सध्या शेतकरी, शेतमजूर सर्वसामान्य जनता, बेरोजगार  तरुणांचे प्रश्न सोडवण्याऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खा. संजय राऊत यांना सरकारचे अपयश झाकण्यासाठी दररोज किळसवाणे प्रदर्शन, अर्वाच्च व अरेरावीची भाषा वापरून महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी विधान करण्यासाठी नेमले आहे. 

तर दुसरीकडे केंद्र सरकारने खा.किरीट सोमय्या यांना महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे वेगवेगळे घोटाळे काढून ईडी ,सीबी आय मार्फत कठोर कारवाई करण्याचे उद्योग करण्यासाठी निवडले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात सुरू असलेला तमाशा व नळावरचे भांडण बंद करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राजीनामा देणे योग्य होईल असे स्पष्ट मतही धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष ॲड रेवण भोसले यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात जवळपास सर्वच मंत्र्यांनी शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी शेकडो कोटीचे घोटाळे केलेले आहेतच. त्यामुळे सर्वच मंत्र्यांना तीहार तुरुंगात टाकले तरी त्याचे कोणाला आश्चर्य वाटणार नाही. केंद्र सरकारने सुरक्षा देऊन जसे खा. किरीट सोमय्या यांना महाविकास आघाडीतील मंत्र्यांचे घोटाळे काढण्यास नेमले आहे. तसेच एखाद्या खासदार किंवा आमदाराला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेमणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जनतेला केंद्र व राज्य सरकारमधील सर्व पुढाऱ्यांच्या नळावरच्या भांडणाचा उबग आला आहे. त्यातच आता एके दिवशी भाजपआघाडीचे नेते घोटाळेबाज आमदार, मंत्र्यांनी राजीनामा द्यावा म्हणून आंदोलन करत आहेत तर दुसर्‍या बाजूला घोटाळे करणार्‍या गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडीचे पुढारी आंदोलन करत आहेत.

त्यामुळे आता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी महाराष्ट्रातील या सर्व गंभीर स्थितीचा तात्काळ आढावा घेऊन केंद्र सरकारकडे वस्तुस्थितीचा अहवाल पाठवावा व महाराष्ट्रात चाललेला तमाशा थांबत नसेल तर महाराष्ट्रात तातडीने राष्ट्रपती राजवटीची शिफारस करावी अशी मागणी अॅडभोसले यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी