अन्य दोन आरोपी फरार; विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नांदेड| गुन्हेगारावर वाचक निर्माण करून कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने गुन्हेगारी करणारे व अवैध शस्त्र बाळगणारे गुन्हेगांराना गजाआड करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिल्यावरून विमानतळ गुन्हे शोध पथकाने अवैध पिस्टल बाळगणाऱ्या एकास विमानतळ पोलिसांनी गजाआडा केले आहे.
यावेळी गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमी दारांकुडन माहिती मिळाली की, एक इसम चंद्रलोक हॉटेल परिसरात कमरेला पिस्टल बाळगुन फिरत आहे. तेंव्हा गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जाऊन विचारपूस केली. यावेळी पोलिसांना पाहुन कावरा बावरा होवुन पळुन जाण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी त्यास पकडुन पंचासमक्ष अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे एक लोखंडी पिस्टल किंमती अंदाजे 15.000/-रूपयाचे ताब्यात मिळाले. त्याचे नाव गाव विचारता त्यांने क्रषीकेश पि. आनंदराव मोरे, वय 28 वर्षे व्यवसाय पानटपरी रा. गांधीनगर नांदेड असे सांगीतले.
यावरून विमानतळ पोलिसांनी त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांने सांगीतले की, सदरची पिस्टल ही प्रविण उर्फ बाळु खोबरे, रा. गांधीनगर यांची असुन, त्यास अनिल पि. रंगराव भांडवले यांनी दिली होती. ती पिस्टल ही प्रविण उर्फ बाळु खोबरे रा. गांधीनगर यांनी माझेकडे ठेवण्यास दिली होती असे सांगीतले. यावरील सदर तीन आरोपी विरूध्द विमानळ पोलीस ठाण्यात गुरन 65//2022 कलम 3/25 भारतीय हत्यार कायदासह कलम 34 भादवि कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एक आरोपी अटक असुन, अन्य दोन आरोपी फरार आहेत. विमानतळचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी चांगली कामगीरी केली याबद्दल वरिष्ठानी त्यांचे कौतुक केले आहे.