नांदेड शहरातील काबरानगर भागात रस्त्याची दुरावस्था; चिखल अन पाणी -NNL

पंधराशे निवासस्थाने, रस्ते दुरावस्थेत नागरिकांची हेंडसाळ..?


नांदेड|
शहरातील वाडी भागातील नौकदार व्यावसायीक संख्या असलेल्या काबरानगरी ते गुरुजीचौक या पट्यातील जवळपास पंधराशे घराची वस्तित पाच सहा हजार वस्तिला जोडणार्‍या रस्त्याची दुरावस्था कमालीची झाली असुन मोठे खडे व त्यातील पाणी मुळे नागरिकांना मोठा ञास सहन करावा लागत आहे.

वाडी ग्रामपंचायतीच्या अख्यात्यारितील हा दोन किमीचा रस्ता असुन दोन्ही बाजुला प्रगतशिल लोकांच्या, दलितांच्या वस्य्त्यांना जोडतो.त्यात काबरानगर,तिरुमला नगर,प्रथमेशनगरी,यशनगरी,साई नगरी,यशश्री नगरी, लईजाई नगरी,रामा सिटी,शिक्षक काॅलनी,मोहन नगरी सोसायटी यासारख्या अनेक नगरीतील येजा करणार्‍यांसाठी हा रस्ता ऊपयुक्त असुन ही या रस्त्यांची व अवस्था पांदण रस्त्यापलीकडे नाही.


काबरा नगर ते गुरुजी चौक पुर्णा रोड या रस्त्याला सध्या क्रमांक मिळाला असुन त्या रस्त्यावर गत अनेक वर्षापासुन पाच हजारांपेक्षा ही जास्त लोकसंख्येचा वावर होत असतो. माञ रस्त्यावर अद्यापही काळी माती असल्यामुळे पावसाळ्यात येजा करताना ग्रामीण भागात राहर्‍या लोकांपेक्षा ही हाल अपेष्टा जास्त होत असतात. रस्त्यातील मोठ्या खड्यामुळे वव त्यातील पाणी साचत असल्याने विद्यार्थी ,महिला व जेष्ठ नागरिकांना प्रवास करताना मोठा ञास सहन करावा लागतो. अनेक महिला व नागरिक गाड्या घसरुन पडल्याच्या घटना दररोजच्या होउन बसल्याने आता दुर्लक्षीत होत आहेत. शाळा, क्लासेस, दवाखान्यात जाण्यासाठीची दररोजची धडपड आता नेहमीची झाली असुन नागरिकांत येथे राहण्यापेक्षा गांव बरा होता अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

या रस्त्यामुळे छञपती चौक ते मोर चौक या रस्त्याची वाहतुक कोंडी कमी होण्या मदत होणार आहे.माञ याकडे राजकिय अनास्थेमुळे दुर्लक्ष होताना दिसुन येते. नांदेड शहरातील रस्त्यांच्या विकासाचा धडाका मा.बांधकाम मंञ्यानी केला असताना ग्रामपंचायती अंर्तगत येणार्‍या या रस्त्यांचा विकास व्हावा अशी माफक अपेक्षा ठेउन आहेत. शहरातील भविष्यातील या मोठ्या रस्त्याचे रुंदिकरण ,मजबुतीकरण व सिंमेट काॅंक्रेट तात्काळ करुन या सर्व नगरातील नागरिकांच्या मरण यातना लवकर संपवाव्यात सर्व पक्षीय, ग्रामपंचायत, या भागाचे आमदार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ब.अशोकराव चव्हाण यांनी याकडे दुरावस्थे कडे लक्ष द्यावे. अशी मागणी या भागात वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी निवेदना द्वारे केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी