नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्यासाठी तंबाखू मुक्तीची शपथ मोहिम -NNL


नांदेड, अनिल मादसवार|
विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर रहावे आणि संपूर्ण जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी  जिल्ह्यातील सर्व शासकीय,निमशासकीय,आश्रम शाळा, खाजगी शाळा, महाविद्यायल आणि खाजगी शिकवणी वर्ग यांनी सोमवार 28 फेब्रुवारी 2022 रोजी तंबाखूमुक्त शपथ घ्यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. 

जिल्हा प्रशासनाच्या वतीने तंबाखू मुक्तीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले असून वेळोवेळी शासकीय कार्यालयांसह अनेक ठिकाणी दंडही वसूल करण्याचे प्रावधान ठेवले आहे. आता या प्रयत्नांसमवेत विशेष शपथ मोहिम हाती घेतली आहे. तंबाखूमुक्त शपथ घेतल्याचा अहवाल ntcpnanded@gmail.com या मेलवर 2 मार्च 2022 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्यस्तरावरून मार्गदर्शक सूचनांचे पालन करून  तंबाखूमुक्तीसाठी शैक्षणिक संस्था, जिल्हृयातील सर्व शासकीय, निमशासकीय, आश्रम शाळा, खाजगी शाळा, आणि महाविद्यालय यांनी दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत या आदेशाचे पालन करावे, असेही निर्देशीत केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी