कोरोना लसीकरण घेतलेल्या हिमायतनगरातील नागरिकांच्या पशुवर मोफत उपचार -NNL

डॉ.सोनटक्के यांचा लसीकरण वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम 


हिमायतनगर|
शहरांसह तालुक्यातील ज्या शेतकरी, नागरिकांनी कोरोना लस घेतली आहे, अश्यांच्या पशूंवर शासकीय पद्धतीने मोफत उपचार केली जाणार आहे. वाढत्या कोरोनावर अंकुश यावे यासाठी डॉक्टर सोनटक्के यांनी हा अभिनव उपक्रम सुरु करून ग्रामीण भागात एक प्रकारे लसीकरण गरजेचे असल्याचे पटून देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

हिमायतनगर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ सोनटक्के नेहमी काही ना काही नवीन करून नागरिकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतात. त्याचा पार्श्वभूमीवर येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -१ जी.नांदेड येथे लास घेतलेल्या नागरिक शेतकऱ्यांच्या पशूंवर मोफत उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या ठिकाणी उपचारास पशु धन आणल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांना शासनाने ठरून दिलेली नोंदणी फीस देऊन लहान - मोठे शस्त्रक्रिया व इतर शासकीय उपचार करून घ्यावे लागते आहे.

आता यासाठी लागणारी फीस हि स्वतः पशुधन विकास अधिकारी डॉ यु बी सोनटक्के हे स्वतः शासनाकडे भरणार आहेत. हा उपक्रम पुढील एक महिना चालणार असून, यामध्ये केवळ ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. अश्या शेतकऱ्यांच्या पशूंवर मोफत उपचार केले जाणार असल्याने शेतकऱ्यांनी आधार कार्ड, व लस घेतलेलं प्रमाणपत्र दाखविल्यानांतर मोफत उपचाराचा लाभ घेता येणार आहे. सादर उपक्रम हा येथील गटविकास अधिकारी, पंचायत स्मीता हिमायतनगर यांची मान्यता घेऊन सुरु करण्यात आला असून, याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी प्रथम सर्वानी स्वतःचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन डॉ.यु बी सोनटक्के यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी