२५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगून सिरंजणीच्या युवकाची फसवणूक -NNL

प्राप्तिकर भरण्यासाठी युवकाला ६ हजार रुपये भरण्यास सांगितले 


हिमायतनगर, अनिल मादसवार|
२५ लाखाची लॉटरी लागल्याचे सांगून ६ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी येथील युवकांसोबत घडला आहे. याबाबत त्याने पोलिसात तक्रार दिली असल्याचे नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सिरंजनी गावातील धम्मा राऊत या युवकाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे संदेश अज्ञात नंबरवरून मोबाईलवर पाठवण्यात आले. त्याचा प्राप्तिकर (टॅक्स) भरण्यासाठी युवकाला १२ हजार २०० रुपये भरण्यास सांगितले. सुरुवातील त्यापैकी ६ हजारांची रक्कम युवकाने बँकेतुन फसवणूक करणाऱ्याच्या खात्यात भरली. त्यानंतर राहिलेली रक्कम भरण्यासाठी वारंवार धम्मा नामक युवकाला फोन येत आहेत. यातून आपली फसवणूक झाल्याचे समजताच युवकाने हिमायतनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. आपल्यासारखी इतर कुणाची फसवणूक होऊ नये यासाठी आपण तक्रार दिल्याचे युवकांनी सांगितले. 

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी येथील धम्मा राऊत नामक युवकाची व्हाट्सएपच्या माध्यमातून एका बैंकेच्या बाहेरील व आतील कैश काउंटर, कैश मोजमापण यंत्राचे व्हिडीओ क्लिप्स, संदेश, आणि सत्यात वाटण्यासाठी प्रत्यक्ष लाभधारक भासून त्याचे व्हिडीओ संभाषण पाठवून फसवणूक करण्यात आली आहे. सुरुवातील अज्ञाताने तुम्हाला २५ लाखाची लॉटरी लागली असे सांगून कोळ करण्यास सांगितले त्यानंतर  त्याच्याकडून सुरुवातील ०६ हजार रुपये उकळण्यात आले आहे. त्यानंतर देखील लॉटरी लागल्याचे सांगून वारंवार पैसे मागितले जात असल्याचे धम्मा राऊत यांनी सांगितले.

 त्याच्या मोबाईल वर आलेल्या फोटो व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप वरून हे सर्व फसवणुकीचा प्रकार असल्याचे स्पष्ठपणे दिसून येत आहे. जेंव्हा त्याच्या लक्षात आले कि, आपली फसवणूक झाली. त्यानंतर अज्ञाताचा कॉल आल्यावर त्याने पैसे परत मागितले. मात्र फसवणूक करणार्याने पैसे परत मिळणार नाहीत पोलिसांकडे जा... कि आणखी कुठेही जा... असे सांगितल्याचे ऑडिओ कोलवरून पुढे आले आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हावी आणि अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

फसव्या कॉल्स व संदेशपासुन नागरिकांनी सावधान व्हावं 

नागरीकांनी फसव्या कॉल्स, सोशल मीडियावर येणाऱ्या मैसेज व अमिषा पासून सावधान व्हावं, कोणतीही बैंक लॉटरी लागल्याचे सांगून पैसे मागत नाही. असे कोणतेही मेसेज अथवा संदेश आल्यास तश्या प्रकारचे आमिष व संदेशाला बळी न पडता सावधानता बाळगावी आणि फसवणुकीपासून सुरक्षित राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी केले. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी