हिमायतनगरात भुसार दुकानाचे शटर तोडून; २ लाखाचे सोयाबीन केलं लंपास -NNL


हिमायतनगर, अनिल मादसवार|
हिमायतनगर शहरातील बोरगडी रस्त्यावर आणि पोलीस स्थानकापासून हाकेच्या अनंतरावर असलेल्या सदाशिव मार्केटमधील तीन भुसार दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोयाबीनने भरलेले 70 पोते लांबविले आहेत. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे आहे, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, श्वानपथक व ठसे तज्ज्ञांच्या माध्यमातून तपास सुरू आहे.



याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहर व तालुक्यातील मागील दोन महिण्यापासून चोरट्यानी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे तालुक्यातील आणि शहरातील अनेक भागात रात्रगस्त सुरु करण्यात आली आहे. कधी शहरात तर कधी ग्रामीण भागातील गाव, वाडी तांड्यात घरफोड्या करणे, घरात नागरिक असताना देखील घरात शिरून चोरी करणे, कुणी आडवा-आडव केली तर हल्ला करून जखमी करत सोने, चांदीचे दागिन्यांसह नगदी रक्कम चोरून नेने अश्या घटनासह शहरातील आणि राष्ट्रीय महामार्गावरील असेलल्या व्यापाऱ्यांचे भुसार दुकाने फोडून सोयाबीनसह इतर भुसार मालाच्या चोऱ्या झाल्या आहेत. एवढेच नाहीतर जिथे काहीच मिळाला नाही त्या ठिकाणचे समानाची नासधूस करून दहशत पसरविणे, ज्या ठिकाणी सीएसटीव्ही कॅमेरे फोडून जमल्यास सीसीटीव्हीच्या सीडीआर देखील चोरून नेल्याच्या घटना मागील काळात घडल्या आहेत. या घटनांचा तपस अजूनही लागलेला नाही. 

दरम्यान पोलिसांनी रात्रगस्त वाढविल्याने १५ दिवसापासून चोरीच्या घटना घडल्या नव्हत्या. चार दिवसापासून थंडीचा कडक वाढला आहे. त्यामुळे लवकरच रस्ते सुनसान होत असून, थंडीच्या याच संधीचा फायदा घेत दि.२२ च्या मध्यरात्रीच्या अज्ञात चोरटयांनी पिकअप जीपमधून तब्बल ७० बोरी भरून असलेले सोयाबीन चोरून नेले आहे. सुरुवातील चोंरट्यानी एकेक करत तीन दुकानाचे शटर मध्यरात्रीला फोडले. आणि कमी वेळात जे घेऊन जात आले तेवढे म्हणजे सोयाबीनचे ७० पोते चोरून नेले आहे.


हि बाब लक्षात येताच व्यापारी पळशीकर बंधू व शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी घटनास्थळावर दखल होऊन पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक भगवान कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी व त्यांच्या टीमने भेट देऊन, श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. श्वान पथकाने दाखल होऊन पाहणी केली, मात्र चोरटे सोयाबीन घेऊन वाहनाने पसार झाल्याने याबाबतचा सुगावा काही लागला नाही. याबाबत सायंकाळी व्यापारी संदीप शकंरराव पळशीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस डायरीत अज्ञात चोरट्यावर ७० बोरी सोयाबीन अंदाजे ४० क्विंटर एकूण १ लक्ष ९० हजारच माल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सदर चोरीचा तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार सिंगणवाड हे करत आहेत. दरम्यान रात्रीला नांदेड- किनवट राष्ट्रीय महामार्गाने पिकअप जीप बोरगडी रस्त्याने मार्केट कमेटीकडून आली असल्याचे ठिकठिकाणच्या तपासणूयात आलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजवरून दिसत असले तरी त्यावर क्रमांक नसल्याने तपासाला गती देऊन चोरट्याने पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी