कुशल कर्म हा बौद्ध तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे - भंते संघरत्न -NNL

गुरु कर्मवीर नगर येथे ४९ वी काव्यपौर्णिमा साजरी ; श्रामणेर प्रशिक्षण केंद्रातील भिक्खू संघाची उपस्थिती 


नांदेड|
जे कार्य केल्याने आपणास दुःख किंवा पष्चाताप होत नाही तर समाधान लाभते, रात्री छान झोप लागते. त्या कम्माला म्हणजेच कर्माला कुशल कर्म असे म्हणतात.  हीच या कर्माला ओळखण्याची कसोटी आहे.‌ तर कर्म हे विज्ञाननिष्ठ व निसर्गनियमांना अनुसरून असले म्हणजे कुशलच ठरते. कुशल कर्म हे बौद्ध जीवन जगण्याच्या तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे असे प्रतिपादन खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांचे शिष्य भंते संघरत्न यांनी केले. 

ते सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित काव्य पौर्णिमा कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भंते धम्मकिर्ती, भंते शाक्यपुत्र, भंते श्रद्धानंद, भंते सुनंद, भंते सुगत, भंते शिलप्रिय, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे अॅड. सोनाळे, काव्यपौर्णिमेचे संकल्पक गंगाधर ढवळे, सम्राट अशोक बुद्ध विहार ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर रणवीर,  यांची उपस्थिती होती. 

कार्तिक पौर्णिमेनिमित्त सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाची ४९ वी काव्यपौर्णिमा साजरी झाली. यावेळी भिक्खू संघाची धम्मदेसना संपन्न झाली. त्यात भंते धम्मकिर्ती बोलताना म्हणाले की, सर्वत्र रुढी, अंधश्रद्धा व धर्मांधतेने कळस गाठलेल्या काळात तथागत भगवान गौतम बुद्धांनी बुद्धीप्रामाण्यावाद हा केंद्रबिंदू असलेला ‘बौद्ध धम्म’ स्थापन केला. वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित शांतता व मानवमुक्तीचे या धम्माचे तत्त्वज्ञान आजही तेवढेच प्रेरक आहे. भंते शाक्यपुत्र यांनी  जो धम्म समता आणि मानवतेवर आधारित आहे.  

जो धम्म विज्ञाननिष्ठ आणि शांतीच्या मार्गाचा आहे, अशा धम्माचा जगभर प्रसार झाला.  बुद्धांनी जगातील शास्त्रज्ञ व विद्वानांना प्रभावित केले आहे. बुद्धांचा धम्म स्वीकारून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रुढी परंपरांच्या जोखडातून समाजबांधवांना मुक्त केले, या संबंधाने मांडणी केली. काव्यपौर्णिमेत प्रकाश ढवळे नागलगांवकर, थोरात बंधू, रणजीत गोणारकर, निवृत्ती लोणे, गंगाधर ढवळे, अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, अॅड. सोनाळे यांनी सहभाग नोंदवला. 

काव्य पौर्णिमा कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप आणि पुष्पपूजन करून अभिवादन करण्यात आले. उपासक सुधाकर रणवीर यांनी संघाकडे याचना केल्यानंतर उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना त्रिसरण पंचशील दिले. त्यानंतर काव्य पौर्णिमा आणि धम्मदेसना कार्यक्रम संपन्न झाला. ट्रस्टकडून भिक्खू संघाला भगव्या पिशव्यांचे दान दिले. बौद्ध उपासक उपासिकांनी संघास आर्थिक दान दिले. यावेळी भिक्खू संघाने खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात येऊन इच्छुकांनी श्रामणेर दीक्षा घेण्याचे व १९ डिसेंबर रोजी पौर्णिमोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गंगाधर ढवळे यांनी केले तर आभार अॅड. सोनाळे यांनी मानले. भिक्खू संघाच्या आशिर्वाद गाथेनंतर सरणत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष वाठोरे, भिमराव सोनाळे, देवराव पाईकराव, अनिल वाठोरे, प्रमोद सोनाळे, वामन पाईकराव, उद्धव धुताडे, वंदना खिराडे, इंदू रणवीर, भारतबाई इंगोले, इंदू धुताडे, वैशाली लोखंडे, ज्योती नरवाडे, निर्मला वाठोरे, सरस्वती वाठोरे, निर्मला सोनाळे, लक्ष्मीबाई रणवीर, लक्ष्मीबाई घोडगे, गयाबाई खिल्लारे, अरुणा हनवते, चमेली इंगोले, सुवर्णा नरवाडे, प्रज्ञा पाईकराव, दीक्षा सोनाळे, लक्ष्मी खंदारे, ज्योती नरवाडे, मंजुळा पाईकराव, मंजू वाठोरे यांनी परिश्रम घेतले. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी