नांदेड| येथील गुरुनानक नगर, नंदीग्राम सोसायटी येथे भाविकांच्या वतीने "दशहरा महात्म" अंतर्गत श्री चंडी साहेब पाठाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी दहा दिवसीय पाठ कार्यक्रमाचे आयोजन येथे करण्यात येते. शीख समाजात दसरा सण भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यात येतो.
त्यानुसार वरील ठिकाणी दहा दिवसाच्या या दसरा कार्यक्रमाअन्तर्गत श्री दशम ग्रन्थ साहेब मधील दुर्गा स्तुति (चंडी चरित्र पाठ), सहस्त्रनाम माला, सवैये, चौपई आणि सुखमनी साहेब वाणीचे पाठ केले जात आहे. तसेच दसरा सणाच्या पौराणिक प्रसंगावर दररोज कथा करण्यात येत आहे. यात महिला आणि लहान मुलांचा ही श्रद्धापूर्वक सहभाग पहायला मिळत आहे. पाठ आणि कथा कार्यक्रमात सहभाग नोंदवणाऱ्या भाविकांसाठी लंगर - प्रसादाचे वितरण करण्यात येत आहे.
मंगळवारी स. लड्डूसिंघ जी ग्रंथी यांनी "दशहरा" विषयावर एक तास धार्मिक कथा केली. त्यांनी श्री दशमग्रन्थ साहेब मधील अनेक घटनाचा सांकेतिक महत्व समजावून सांगितले. वरील कार्यक्रमाचे संचालन इंदरजीतसिंघ सुखमनी, मनप्रीतसिंघ बाजवा, अरविंदरसिंघ हैदराबादवाले, बाबुसिंघ बासरीवाले, भीम सिंघ बेल्थरवाले, राजिंदरसिंघ बसरीवाले, अमितसिंघ लाइटवाले, किरपालसिंघ लिखारी, रणजीतसिंघ त्रिकुटवाले, गुरसागरसिंघ सुखमनी, नारायणसिंघ कोटतीर्थवाले, बीरसिंघ मोगलीवाले, गुरबचनसिंघ नगारची, गुरबचनसिंघ भाटिया, गुरचरनसिंघ बॉडीबिल्डर, केसरसिंघ सोखी, धरमसिंघ शिकरघाटवाले, त्रिलोचनसिंघ सोहल, रतनसिंघ त्रिकुटवाले सह युवक मण्डळी आणि महिलांचा जत्थातर्फे करण्यात येत आहे. दसऱ्याच्या दिवशी वरील पाठ आणि धार्मिक कार्यक्रमांचे समापन करण्यात येणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.