भाजपा किसान मोर्चा पदधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आडचणीत सोबत राहावे - खा.प्रताप पा.चिखलीकर -NNL


नांदेड|
मनुष्याच्या प्रमुख गरजा पैकी अन्न हि गरज सर्वात महत्त्वाची आहे व शेतकरी राजा कष्टाने आपल्याला हे सातत्याने देण्याचे काम करतो. म्हणून शेतकऱ्यांच्या  आडाचणीत भाजपा किसान मोर्चा पदधिकारी यानी सोबत राहावे असे प्रतिपादन खा.प्रतापराव पा,चिखलीकर यानी केले. भाजपा किसान मोर्चा शेतकरी संवाद अभियान कार्यक्रमात ते बोलत होते, यावेळी प्रमुख उदघाटक म्हणून भाजपा किसान मोर्चा प्रदेशध्यक्ष वासुदेव नाना काळे हे होते. 


नांदेड जिल्हा भाजपा किसान मोर्चा यांच्या वतीने दि.9 जुलै रोजी दु.12 वाजता 'शेतकरी संवाद अभियान' कार्यक्रमाची बैठक 'साईसुभाष' अंनदनगर येथे संपन्न झाली. यावेळी नांदेडचे खासदार प्रतापराव पा.चिखलीकर यानी काँग्रेस व महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली. प्रत्येक विषय राज्यसरकार हे केन्द्रंसरकारचा आहे म्हणून वेळ काढुन नेत आहे. नांदेड जिल्हात काही भागातच पिकविमा कसा मंजुर केला जातो. काही नांदेडचे आमदार पिकविमा मिळण्यासाठी पत्रकबाजी करत आहेत पण प्रत्यक्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबाना भेटले का? आसा सवाल त्यानी केला. गेल्या वर्षी आतिवृष्टी झाली नांदेड जिल्हात शेतकऱ्याचे हातात आलीली सुगी निघुण गेली. राज्यसरकारणे तुटपुंजी मदत केली. पिकविमा बिड पाँटर्ण काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे आसे यावेळी खा.चिखलीकर यानी प्रतिपादन केले.   


भाजपा किसान मोर्चा नांदेड शेतकरी सवांद अभियान प्रमुख उदघाटक म्हणून प्रदेशध्यक्ष वासुदेव नाना काळे, सरचिटणीस मकंरदजी कोरडे, सुधाकरराव भोयर, सचिव रगंनाथराव सोंळके, पंडीतराव वडजे, रावसाहेब देशमुख तर भाजपा महानगरध्यक्ष प्रविण आण्णा साले, श्रावण पा.भिलवंडे, सुरजीतसिगं ठाकुर, मारोती वाडेकर, विजय गंभीरे, अँड.दिलीप ठाकुर, राजीव गंदिगुडे, प्रभु कपाटे, शितंल खाडील.तर किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाबुराव केन्द्रें, महानगरध्यक्ष बाबूराव पाटील शिंदे, सरचिटणीस सुधाकर पाटील सोनारीक, सरचिटणीस दतात्रय चंदनफूले, सुभाषराव मगरे, भगवानराव पा.नागेलीकर, विनोद दुर्गेकर सोनारीकर, बाबाराव पाटील गवते, गोविंदराव वाकोरे, आत्माराम मुंढे, शिवाजीराव जाधव, सुयंकात पाटील शेळगांवकर, इरवंता तोनसुरे, विनायक पाटील शेळगांवकर आदि पदधिकारी व जिल्हा कार्यकारणी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हाअध्यक्ष बाबुराव केन्द्रें यानी केले तर सुत्रसंचलन सुनिल रामदासी व आभार दतात्रय चंदनफुले यानी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी