हिमायतनगर,अनिल नाईक| जुन्या वहिवाटीचा रस्ता असतांनाही भविष्यात शेतीचा प्लॉटिंग व्यवसाय करण्यासाठी मर्जी सांभाळत तहसीलदार, व नायब तहसीलदार यांनी श्री परमेश्वर मंदिर कमिटीच्या ताब्यातील जमिनीतुन विस फुटाचा रस्ता काढून देण्याचा घाट घातल्याने मंदिर कमिटीसह शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तींनी तहसिल कार्यालयात जावुन नायब तहसिलदारास जाब विचारला. यावेळी नायब तहसिलदार सय्यद इस्माईल यांची भंबेरी उडाली होती. या रस्त्यामुळे धार्मिक आस्था असलेल्या गावकऱ्यांची मने दु:खावली जाणार असल्याने हा निर्णय तात्काळ रद्द करावा. अशी मागणी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांचेसह विश्वस्तांनी आ.माधवराव पाटील जवळगावकर, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसिलदार यांचेकडे भ्रमणध्वनीवरून केली आहे.
श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीची रेल्वे रूळा लगत व राष्ट्रिय महामार्गाच्या कडेला जमिन आहे. या जमिनीत तहसिल व रजिस्ट्री ऑफिस, आता न्यायालयाला जमिनी कमिटीनेच दिली आहे. जोपर्यंत जमिन पडिक होती, तहसिल पंचायत समिती, रजिस्ट्री ऑफिस होते तोपर्यंत शेताच्या वरच्या शेतकऱ्यास कुठुनही जाण्यास रान मोकळे होते. परंतु आता न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे, वाल कंपाउंडच्या बांधकामाचे मार्काऊट देखिल झाले आहे. यापुढे हा रस्ता बंद होईल पुढे रेल्वे पटरी पासुनच्या वहिवाटिच्या दूरच्या रस्त्याने यावे लागेल. त्यामुळे पण केलेल्या जमिनीचे बाजार मूल्य कमी होईल. या हेतुन येथिल शेतकरी मारुडवार यांनी महसुलच्या नायब तहसिलदार सय्यद यांना हाताशी धरून न्यायालयाच्या वालकंपाउंडच्या बाजुने विस फुटाचा पूर्व पश्चिम रस्ता मागितला होता.
सदर प्रकरण निकाली काढुन रस्ता काढण्याची गैरअर्जदार श्री परमेश्वर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरसेठ श्रीश्रीमाळ यांना नोटीस पाठविली. तसे पाहता कमिटीचे पदसिध्द अध्यक्ष तहसिलदार असतांना त्यांना याबाबतीची नोटीस नं देता एक प्रकारे दिशाभूल करत त्यांनी या प्रकरणात मंदिर कमिटीला विश्वासात न घेता सुट्टी असल्याच्या दिवशी एक दिवस अगोदर सायंकाळी उशिरा पोचेल अश्या बेताने नोटीस पाठविली होती. त्यामुळे मंदिर कमेटीचे सदस्य माधव पाळजकर, मुलचंद पिंचा, अनंता देवकते, लताताई पाध्ये, मथुराबाई भोयर, लताताई मुलंगे, अनिल मादसवार, लिपिक बाबुराव भोयर, आदींसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक रामभाऊ ठाकरे, कुणाल राठोड, पांडुरंग तुप्तेवार, विलास वानखेडे, गजानन चायल, हनुसिंग ठाकूर, भाऊराव वानखेडे, हरडपकर काका, सावन डाके, देवराव वाडेकर, विजय दळवी, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गोविंद गोडसेलवार, अनिल नाईक आदींसह अनेकांनी तहसील कार्यालय गाठून अकर्मक पवित्र घेत आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना या प्रकारची माहिती दिली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर याना कळविले.
भलेही मंदिराच्या अधिकारासाठी गुन्हे दाखल झाले तरी चालतील मात्र मंदिराची एक इंचही जमीन देणार नाही असा पवित्रा घेतला होता. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्याच्या आदेशाने आजच्या परिस्थितीत रस्त्याचा प्रश्न थांबविण्यात आला असून, याबाबत सोमवारी होणाऱ्या बैठकीच्या चर्चेत संबंधित शेतकऱ्यास त्याला पूर्वी देण्यात आलेला रस्ता असताना दुसरा रस्ता देणार नाही अशी मंदिर समितीची भूमिका आहे. तहसीलदार गायकवाड यांना कुठल्याही परिस्थितीत रस्ता काढण्याचा आदेश खारीज करण्यात यावा. सदर शेतकऱ्याच्या शेतीसाठी जाण्याचा रस्ता पूर्वीच वहिवाटी पद्धतीने मंदिर कमिटीच्या जमिनीच्या वरच्या बाजूने दिलेला असल्याचे सांगण्यात आले तसेच याबाबतचा नकाशा संबंधित नायब तहसीलदार दाखविण्यात आला आहे.
परमेश्वर मंदिर कमेटी रस्ता काढण्याचा आदेश खारीज करण्यावर ठाम..!
श्री परमेश्वर मंदिर कमेटी च्या ताब्यातील जमिनीतून रस्ता काढण्याच्या प्रकरणाच्या अनुशंगाने उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या उपस्थितीत परमेश्वर मंदिर परिसरात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीत मंदिर कमेटी सदस्यांसह ग्रामस्थांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर रस्ता प्रकरणाबाबत निर्णय घेण्यात येणार असून, परमेश्वर मंदिर कमेटी रस्ता काढण्याचा आदेश खारीज करण्यावर ठाम आहे.