नांदेड| नायगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे , खरीप हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी आज मांजरम परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केल्यानंतर केली आहे.
यावेळी पांडुरंग शिंदे यावेळी म्हणाले की, पाऊस किती प्रमाणात पडतो हे सरकारी यंत्रणेकडे नोंद असते. त्यामुळे तक्रारीची वाट न बघता महसूल व कृषी खात्याला जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावे. आणि पिक विमा कंपनीचे फोन लागत नाहीत कारण एक नंबर लाखो शेतकरी फोन करत असताना १% टक्के लोकांची तक्रार नोंदवली जाते. त्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात पिक विमा कंपनीकडे तक्रार करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करावी. ज्याप्रमाणे पिक विमा भरण्यासाठी गावा- गावत सेतू केंद्र उभा केले तसे पिक विमा तक्रारी नोंदणी केंद्रे उभे करावेत.
वन्यप्राणी हरीण, रानडुकर, मोर या प्राण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वनविभागाकडून मदत जाहीर करावी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवा नेते शिवाजी गायकवाड, हणमंत लंगड़ापूरे ,नामदेव काळे ,बालाजी काळे ,सुभाष कवळे ,हणमंत हलबुरगे इत्यादी उपस्थित होते.

