तात्काळ पर्यायी रस्ता तयार करून प्रवाशांची हेळसांड थांबवा
हिमायतनगर,अनिल नाईक| राष्ट्रीय महामार्गामधील पुलाचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवल्यामुळे प्रवाशी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, काल झालेल्या मुसळधार पावसाने पर्यायी पूल वाहून जाऊन वाहतूक ठप्प झाली आहे. आज सकाळी तर या ठिकाणी ट्रक फसल्याने प्रवाश्याना मोही कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. या प्रकारामुळे नागरिकांनी ठेकेदाराच्या नाकर्तेपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ किमान तात्पुरता तरी पर्यायी पूल दुरुस्त करून अडचण दूर करावी अशी मागणी केली आहे.
काल हिमायतनगर शहरासह तालुक्यात तुफान पाऊस झाला या पावसाने अनेकांचे शेतीचे होत्याचे नव्हते झाले. त्याचाच फटका राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अर्धवट पुलाच्या अबाजूबाजूच्या लोकांना बसला असून, अनेकांची शेती वाहून गेली आहे. तर पर्यायी पूल वाहून गेल्याने मार्ग बंद पडले आहेत. हिमायतनगर शहरानजिक रखडलेल्या अर्धवट पुलामुळे पुराच्या पाण्याने येथील पर्यायी पूल खचला आहे. त्यामुळे येथून वाहनधारकांना मोठ्या जिकरीचे प्रवास करावा लागतो आहे. काल या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी उभे राहून वाहतुकीला मार्ग काढून दिला. मात्र आज सकाळी अक्षरशा येथे लाकडे घेऊन जाणारा ट्रक फसल्याने वाहनधारकासह प्रवाश्यांची मोठी दैना झाली आहे.
अनेकांना तर दुचाक्या ढकलून मार्ग काढावा लागत आहे. काहीजणांची तर अक्षरशा घसररगुंडी झाली असून, ठेकेदाराच्या नावाने बोटे मोडण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. खरे पाहत पावसाळीपूर्वी ठेकेदारने संबंधित पुलाचे कामे पूर्ण करून वाहनधारक प्रवाशांना अडचण होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे होते. मात्र याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आज हि परिस्थिती उद्भवली आहे. पावसाळा सुरु झाल्यापासन दुसऱ्यादा या ठिकाणी वाहनधारकांना हैराण व्हावं लागला आहे. आगामी पावसाळ्याच्या दिवसात पुन्हा हि परिस्थिती उद्भवू नये म्हणून तातडीने या पुलाचे अर्धवट काम पूर्ण करून ठेकेदाराने नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी व प्रतिक्रिया नागरीकातून उमटत आहेत.
...वृत्त संपादन अनिल मादसवार

