नांदेड़| महाराष्ट्र राज्याने ई.स.२०१२ मध्ये युवा धोरण जाहिर केले.त्या अनुषंगाने राज्यात व जिल्ह्यात दरवर्षी क्रिडा पुरस्कार दिले जातात.पण नांदेड च्या जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाकडून माञ गेल्या काही वर्षापासून सर्वच प्रकारच्या पुरस्काराबाबत उदासिनता दिसून येत आहे.त्यामुळे खेळाडूं,संघटक,मार्गदर्शक व नोंदणीकृत सेवाभावी संस्थेचे प्रतिनीधींनी याबाबत क्रिडा कार्यालयाच्या विरोधात तिव्र रोष व्यक्त करत आहे.
राज्यातील व जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहितांच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी राज्य व राज्यातील सर्व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार देण्यात येतो.क्रिडा धोरणानासूर दरवर्षी गुणवंत महिला व पुरुष खेळांडू,गुणवंत क्रिडा मार्गदर्शक,गुणवंत क्रिडा संघटक,गुणवंत क्रिडा कार्यकर्ता,नोंदणीकृत सेवाभावी संस्थेला ई.प्रकारात पुरस्कार दिले जातात.मागच्या सन २०१८-१९,२०१९-२० या दोन वर्षासाठी नांदेड जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने पुरस्कार मागविण्यात आले होते.
या दोन वर्षासाठी किती प्रस्ताव आले,निवड समितीने कुणाची निवड केली, गुणाकंन कशे दिले, नंतर आलेले सर्व प्रस्ताव अचानकपणे रद्द का करण्यात आले? याबाबत रितसर प्रस्ताव दाखल केलेल्या अर्जदारांना कोणतीही पुर्व सुचना न देता जिल्हा युवा क्रिडा पुरस्कार रद्द केले गेले. याचे उत्तर संबंधित कार्यालयातील अधिकारी द्यायला तयार नाही.तर सन २०२०-२१ २०२१-२२ या वर्षात तर युवा पुरस्काराची जाहिरात काढली नाही उलट पुरस्कारासाठी आलेला अनुदान शासनाला परत पाठविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.एकंदरीत चार वर्षापासून जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व तेथे कार्यरत क्रिडा अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी व हम करे सो कायदा अश्या तुघलकी फर्मानमुळे नांदेड शहर जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणा-या खेळांडू,मार्गदर्शक,संघटक,कार्यकर्ता व नोंदणीकृत संस्थेच्या प्रतिनिधींना युवा पुरस्कारापासून वंचित रहावे लागत आहे.
