हदगाव, शे.चांदपाशा| तालुक्यात गतवर्षी पिकाचे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले. पिक विमा काढल्यावर ही कपनीकडुन त्याचा मोबदला देण्यात आला नाही. तसेच प्रशासनाकडुनही या बाबतीत जनजागृति होत नसल्याने शेतक-यानी पीकविमा काढण्याकडे पाठ फिरवल्याचे दिसुन येत आहे.
प्रशासकीय स्तरावर या बाबतीत कोणत्याही प्रकारची माहीती मिळत नाही. गतवर्षी तुलनेत यावर्षी ५०% शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आसावा असा प्राथमिक अदाज आहे. गेल्या वर्षी आतिवृष्टीमुळे मुगाचे पीक उभे असताना त्या शेगामधुन कोंब फुटले होते. त्यामुळे पण शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला होता. नंतर परतीच्या पावसाने सोयाबीनचे पण प्रचंड नुकसान झाले. मात्र पीक विमा कंपनीने या बाबतीत शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही. जेव्हा कृषि विभागा सांगत होता की, पुढील वर्षाकरिता बियाणे साठवण करा.
यावरून सोयाबीन या पिकाचे किती नुकसान झाले असावे याचा अंदाज येतो. हे सर्व काही विमा कंपनीला माहीत असुन, ही शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी विमा कंपनीने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम केले आहे. विशेष म्हणजे गत वर्षी मोठ्यानं पीकविमा काढण्यात आला होता. निव्वळ किचकट अटी लादल्या होत्या विशेष म्हणजे बहुतांशी शेतकऱ्यांना आँनलाईनच्या शर्ती घालण्यात आल्यामुळे शेतक-याचे प्रचंड प्रमाणात अर्थिक नुकसान झाले. यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना तितकसा पीकविमा कंपनीला प्रतिसाद दिला नाही.
नादेड जिल्ह्यात इफ्को टोकीयो जनरल इन्सुरअस कं लि. ही पीक विमा कँपनी असुन, त्याचे मुख्य कार्यालय हरियाणा राज्यात आहे. त्याचे हेल्पलाईनवर तर कधी ही संपर्क होत नाही. अणखी विशेष म्हणजे गतवर्षी हदगाव शहरात तहसिल कार्यालय मध्ये खा. हेमत पाटील यांनी अतिवृष्टीचा आढवा बैठकीत या कंपनीच्या अधिक-याने तालुका पातळीवर विमा कंपनीचे कार्यालय ओपन करु म्हणुन सागितले. ते कार्यालय अध्याप सुरु झालेले नाही हे जिथं खासदाराना ह्या कंपनी उल्लु बनवत असेल तर तिथे सर्व सामान्य शेतक-याचे काय..? असा सवालही उपस्थित होत आहे.