अवैध दारू विक्री बंद करा - शिराढोण मध्ये मागणी -NNL


उस्माननगर, माणिक भिसे|
येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण (ता.कंधार) येथील अवैध दारू विक्री बंद करा या मागणीचे निवेदन येथील पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. 

शिराढोण येथील मनोज मधुकर जमदाडे यांनी दिलेल्या निवेदनात "गावात  बऱ्याच वर्षांपासून काही मंडळी अवैध दारू चोरट्या मार्गाने जास्त दराने विक्री करीत आहेत. नांदेड ते बिदरला जाणाऱ्या उस्माननगर ते कंधार व उस्माननगरहून गोळेगाव हाळदा मार्गावर जागोजागी हाॅटेल, धाबे यांची  मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

ज्याच्या कडे दारू, भारीची दारूच्या विक्रीची परवानगी नसताना सुध्दा मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. यामुळे गावागावात भाडण होवून  अनेकांची कुटुंबे उध्वस्त होत आहेत. याचा विपरीत परिणाम मुलांवर, त्यांच्या भवितव्यावर होत आहे. अशा व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्या मुसक्या आवळून अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी