लोह्यात वृक्षमित्र परिवाराचा अनोखा उपक्रम; डॉक्टर व महिलांच्या पुढाकाराने स्मशानभूमीत वृक्षारोपण -NNL


लोहा|
लोह्याच्या स्मशानभूमीची स्वछता तसेच वृक्ष लागवड व त्याला जाळी लावून संगोपन करण्याचा निर्धार उच्चविद्याविभूषित महिलांनी केला त्यांना ज्येष्ठ नागरिकांच्या साथ मिळाली. त्यामुळे या स्मशान भूमीच रुपडं आता बदलले आहे. वृक्षमित्र परिवार आणि स्वछता दूत असलेले व सदैव वृक्ष संगोपनासाठी झोकावून दिलेले राजीव तिडके गुरुजी यांची धडपड यासाठी महत्वाची ठरली. उल्लेखनीय म्हणजे  प्रसिद्ध  महिला डॉक्टरांचा  ग्रुप या उपक्रमात सक्रिय होता.

वसुंधरा संवर्धन हेतूने लोहा वृक्षमित्र परिवाराच्या वतीने दि.१८जूलै रोजी  स्मशानभूमीत श्रमदानातून स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक रतनसिंह परिहार तर प्रमुख पाहुणे पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे होते. उपेक्षित, अंधश्रद्धेच्या नजरेने भूतबाधा होणाऱ्या ठिकाणी म्हणजे स्मशानभूमीत वृक्षमित्र परिवाराच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व वृक्षलागवड करण्यात आली. त्याला जाळ्या बसविण्यात आले आहेत या उपक्रमाचे संयोजक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वृक्षमित्र रामराव संगेवार व स्वच्छतादूत राजीव तिडके यांच्या अथक परिश्रम यासाठी उपयुक्त ठरले. याकामी इनव्हिरियल महिला क्लब, वृक्षमित्र परिवार सदस्य व नगर परिषद यांनी अनमोल सहकार्य केले.

समाजविधायक व पर्यावरपूरक उपक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष तानाजी मच्छेवार, व्हि.के. कांबळे, वाय.बी.महाबळे,विश्वांभर काकडे,इनरव्हील क्लबच्या सदस्या माजी नगरसेविका शोभा बगडे, डॉ. सविता घंटे, डॉ. संगीता ब्याळे, डॉ. सीमा सोमवार, डॉ.राजश्री भोसीकर, ( इनर्व्हिल ग्रुप)  सविता सातेगावे,नीता तिडके, रुक्मिणी गायखर,योजना भोस्कर , कौशल्याबाई संगेवार  मीरा सुर्यवंशी मँडम,मंजुषा पोसकुटवार,कदम मँडम यांचा सहभाग होता. ज्येष्ठ नागरिक राम संगेवार स्वच्छता दूत राजीव तिडके, पत्रकार बा.पु.गायखर, सुदर्शन शिंदे, विश्वांभर वाडेवाले,विरभद्र स्वामी,वैभव वाडेवाले, जगन काळे, बालाजी पांचाळ मामा,पत्रकार बाळासाहेब बुध्दे, शिवहार गालफाडे,मंगल सोनकांबळे  व न.पा.कर्मचारीआदिंनीही स्वच्छता करून एकत्रपणे लोखंडी जाळ्यासह वृक्षारोपण केले. यावेळी पोलिस निरीक्षक संतोष तांबे नगरपालिका कार्यालयीन अधिक्षक उल्हास राठोड आदी उपस्थित होते. महिला डॉक्टरांचा तसेच शोभाताई बगडे व त्यांच्या टीमचे सहकार्य यासाठी मिळाले.

कार्यक्रमाचे संचलन मंगल सोनकांबळे यांनी तर आभार स्वच्छता दूत राजीव तिडके यांनी केले.शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी तसेच उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, गटनेता करीम शेख, नगरसेवक दता वाले यांच्यासह सर्व नगरसेवकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे आणि या ग्रुपचे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. हा अत्यंत चांगला उपक्रम राबविला यापुढेही या ग्रुपला सामाजिक उपक्रमासाठी पालिका प्रशासनाचे सहकार्य राहील असे सांगितले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी