सिडको योजनेतील घरावरील व्याज माफ करून घरे हस्तांतरीत करावी- माजी नगरसेविका डॉ.करूणा जमदाडे -NNL

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी


विन नांदेड। योजना क्रं १ ते ४ मधील सिडको हाडकोचे घरे हस्तांतरण करतांना सिडकोच्या घरावर असलेली सर्व कर्ज माफी करावी अश्या मागणीचे निवेदन सिडको संघर्ष समिती सदस्य माजी नगरसेवीका डॉ. करुणा जमदाडे यांनी  आमदार मोहनरावजी हंबर्डे  यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.

सिडको प्रशासनाने दिलेल्या योजना क्रं १ ते ४ अंतर्गत अनेक घरे देण्यात आली आहेत. २००४ मध्ये ना .अशोकरावजी चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी सिडकोच्या घरावरील कर्जमाफी करून सिडको च्या नागरिकाना मोठा दिलासा दिला होता. त्याच धर्तीवर  हा निर्णय घ्यावा अशी विनंती या निवेदनात केली आहे.

२००४ ते २००५ या काळात केलेल्या पाठपुराव्याचे सर्व दस्तावेज सहीत निवेदन देण्यात आले असल्याचे निवेदनाद्वारे माजी नगरसेविका डॉ.करूणा जमदाडे यांनी केली आहे.

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post