अतिवृष्टी जाहीर करण्याची केली मागणी
नायगांव| तालुकातील कुंटुर सर्कलमध्ये मागील चार दिवसांपासून महसूल मंडळांमध्ये सतंतधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे खरीप पिके धोक्यात आली असून, शेतकऱ्याचा नुकसानीला समोर जावे लागत लागत आहे. हि बाब लक्षात घेता तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
नायगाव तालुक्यातील कुंटूर मंडळामध्ये जोरदार पाऊस पडत आहे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत अनेकांची पिके व शेतातील पिके पाण्याखाली गेली असून काही गावांमध्ये पाणी शिरले आहेत. गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने नदी व नाल्याची पाणी पातळी वाढणार याची धोकाची ओलांडली आहे तहसीलदार गजानन शिंदे, नायब तहसीलदार लोंढे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी निवेदन देताना धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र सरचिटणीस बालाजी पाटील नारे, माणिक पाटील चव्हाण, हाणमंत पा.मिरकुंटे, राजेश पा.सालेगाये,व्यंकट पा.नारे, किशन पा.नारे, सतोष पा.करखेले, उमा पा.पेदे, बालाजी पा.नारे, योगेश पा.नारे, माधव पा.नारे, हाणमंत पा.नारे, गणेश काळेवाड, अनिल वाघमारे, सुनिल शेळगांये, बालाजी पा.धोते, अविनाश मोहिते,विजय पा.शेळगांवकर, अादिची स्वाक्षरी अाहेत.
कुंटुर सर्कलमध्ये कोकलेगाव, शेळगांव(छञी), चारवाडी, परडवाडी, डोंगरगाव, हंगरगा, सातेगांव, सुजलेगांव, ईकळी, हुस्सा, डोंगरगांव, सालेगांव, सांगवी आदी गावांमध्ये या मार्गावरील रस्ते आणि वाहतूक बंद झाली आहेत मागील आठवड्यात सलग चार दिवस पाऊस झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अति मोठ्या प्रमाणात आतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे आपल्या मार्फत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शासनास अहवाल पाठवावा व अतिवृष्टी जाहीर करावी. अशी मागणी धनगर समाज युवा मल्हार सेना यांनी केली आहे.
