कृषि औजारे बँक योजनेसाठी 5 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत -NNL

नांदेड| ​मानव विकास कार्यक्रमांतर्गंत कृषि औजारे बँक योजना ही जिल्ह्यातील हिमायतनगर, देगलूर, किनवट या तालुक्यात कृषि विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आत्मातर्गंत नोंदणीकृत महिला बचतगटांनी संबंधीत तालुका कृषि कार्यालयात गुरुवार 5ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज सादर करावेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे. 

मानव विकास कार्यक्रम सन 2020-21 अंतर्गत निवडलेल्या तालुक्यात प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार हिमायतनगर, देगलूर, किनवट तालुक्यामध्ये प्रति तालुका एक औजारे बँक इतके लक्षांक कृषि कार्यालयास प्राप्त झाले आहे. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पद्धतीने लक्षांकाच्या अधिन राहुन लाभार्थ्याची निवड करण्यात येईल. मार्गदर्शक सुचनेप्रमाणे काम पूर्ण करणाऱ्या गटांना 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा महिला शेतकरी बचतगटांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाने केले आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी