हिमायतनगर, अनिल नाईक| तालुक्यातील मौजे वाघी-किरमगाव ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात असून, त्यांच्या तीन पैकी आता एका सदस्याने आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्यावर विश्वास ठेऊन काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलं आहे. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीच्या हालचालींना वेग आला असून, लवकरच या ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झंडा फडकेल असा विश्वास शिवाजी माने पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मागील सहा महिण्यापुर्वी झालेल्या वाघी-किरमगाव ग्रामपंचायतची ७ सदस्यासाठी निवडणूक पार पडली होती. त्यावेळी शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित होऊन हि ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती. दरम्यान एका सदस्याचे निधन झालं. त्यांनतर ग्रामपंचायतीत ६ सदस्य होते त्यापैकी ३ शिवसेना आणि ३ काँग्रेस असे पक्षीय बालंबाल असल्याने राजकीय हालचालीला वेग आला. आणि हि ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहावी यासाठी दोन्ही पक्षाकडून प्रयत्न सुरु झाले. यात काँग्रेसने बाजी मारण्यात यश मिळविले आहे.
`
येथील काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते शिवाजी पाटील माने यांनी अखेर येथील शिवसेनेचे ग्राम पंचायत सदस्य गंगाधर हामद यांना आपल्याकडे खेचून घेतले. आणि दि.२५ रोजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या निवास्थानी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी ओम देवसरकर, दिगंबर देवसरकर, सिद्धार्थ गायकवाड, श्याम हामंद, संदीप माने अमोल देवसरकर, प्रकाश गायकवाड, सुनील देवसरकर, सोपान देवसरकर, माधव वाघमारे, रमेश कदम यांची उपस्थिती होती. या राजकीय खेळीमुळे वाघी-किरमगाव ग्रामपंचायत आता काँग्रेसच्या ताब्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होईल असे चित्र सध्यातरी दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ताब्यातील ग्रामपंचायत आपल्याकडे खेचून आणण्यात काँग्रेस यशस्वी ठरली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे.