नसोसवायएफ संघटनेला ना.धनंजय मुंडे यांचे अश्वासन -NNL

एम.फिल. प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी बार्टी फोलोशिप देणार


नांदेड| डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र(बार्टी) मार्फत २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षातील एम.फिल. च्या सर्व विद्यार्थ्यांंना फेलोशिप येत्या काही दिवसातच देऊ असे अश्वासन सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी नँशनल एससी/एसटी/ओबीसी स्टुडंट अँन्ड युथ फ्रन्ट(नसोसवायएफ) विद्यार्थी संघटने सोबत चर्चा करून दिले. 

      

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बाटी) ने शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० आणि २०२०-२०२१ या वर्षात राज्यातील एम. फिल, पी.एचडी. च्या संशोधन विद्यार्थ्यांसाठीची फेलोशिफचे अर्ज अद्यापपर्यंत मागविण्यात आले नसल्यामुळे विद्यापीठीय स्तरावर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांंना संशोधन करण्यासाठी आनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

 

राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हित संवर्धनासाठी राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली. राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थितीही हालाखीची आहे. २०२० पासून सुरु असलेल्या ताळेबंदीमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी कसे शिक्षण घ्यावे, त्यात राज्य सरकारने सुरु केली. स्वाधार योजनेची २०२९-२०२० या शैक्षणिक वर्षाची पुर्ण रक्कम ही विद्यार्थ्यांना मिळाली नाही, तसेच २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षाचे अर्ज अद्यापही समाज कल्याण विभागाने स्विकारले नाही.



 डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टी) या केंद्राची स्थापनाही राज्यातील अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तसेच या समाजातील संशोधकाना वाव देण्यासाठी करण्यात आली होती. पण बाटी मार्फत २०१९ पासून ते २०२१ या वर्षातील विद्यार्थ्यांंसाठी फेलोशिपचे अर्ज मागवण्यात आले नाहीत तसेच इतर संशोधन व प्रशिक्षण केंद्रांच्या एम.फिल. आणी पि.एचडी विद्यार्थ्यांंना सरसकट फेलोशिपचे आर्ज मागवण्यात आली परंतु अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांंसाठी फिलोशिप चे अर्ज मागवण्यात आले नाहीत अश्या समस्यांबाबत ना.मुंडे यांच्याशी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. 

 

यावेळी सामाजिक न्यायमंत्री मा.धनंजय मुंडे यांनी नँशनल एससी/एसटी/ओबीसी स्टुडंट अँन्ड युथ फ्रन्ट(नसोसवायएफ) या विद्यार्थी संघनेच्या पदाधिकाऱ्यांना अश्वासन दिले कि लवकर डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र(बार्टी) तर्फे अनुसुचित जाती प्रवर्गातील एम.फिल च्या प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांंना फेलोशिप साठी अर्ज मागवण्यात येणार आहेत. निवेदन देऊन चर्चेत प्रा.सतिश वागरे, स्वप्निल नरबाग, संदीप जोंधळे,मनोहर सोनकांबळे,प्रविण सावंत,अनुपम सोनाळे उपस्थित होते. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी