प्रज्ञाशोध परीक्षेत नांदेडचा अरुण लिंगदळे राज्यात दुसरा - NNL

जिल्ह्यातील एकुण 35 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय परीक्षेसाठी निवड 



नांदेड| दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. दहावीसाठी राज्यस्तरीय चाचणी परीक्षा (लेबल-1) ही 13 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले असून अरुण ईश्वरराव लिंगदळे हा राज्यात दुसरा आला आहे. 

या परीक्षेत नांदेड जिल्ह्यातून खुल्या प्रवर्गातून 12, ओबीसी प्रवर्गात 8, एससी प्रवर्गात 1, एसटी प्रवर्गात 13 तर इडब्लूएस प्रवर्गात 1 असे एकुण 35 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय परीक्षेसाठी निवड झाली आहे. शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत घेण्यात येते. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे, त्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करणे या हेतूने ही परीक्षा घेण्यात येते. 

या परीक्षेत लेबल 1 मध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थी हे केंद्रीय स्तरावर होणाऱ्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर एनटीएसई परीक्षा एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे. संबंधित निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्या www.ncert.nic.in या संकेतसथळावर यथावकाश उपलब्ध होतील. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता एनटीएसई परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जुलै महिन्यापासून परीक्षेचे मार्गदर्शन संबंधित शाळांनी उपलब्ध करुन दयावे, असे शिक्षणाधिकारी (मा.) यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी