आ. बालाजी कल्याणकर यांनी मरळक वासियांना दिलेला शब्द पाळला…NNL

पंधरा वर्षानंतर मुख्य रस्ता झाला मोकळा



नांदेड| अतिक्रमण काढून पंधरा वर्षानंतर आ. बालाजी कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व गावकर्‍यांच्या मदतीने मरळक तीर्थक्षेत्र गावच्या  मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला आहे. त्यामुळे गावकर्‍यांसह भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.

मरळक येथे पुरातन श्री विमलेश्वर महादेव मंदिर आहे.  हे मंदिर पर्यटन व तीर्थक्षेत्र मध्ये समाविष्ट आहे. नांदेड तालुक्यातील श्रद्धास्थान विमलेश्वर असलेल्या मरळकच्या मुख्यरस्त्यावर मागील पंधरा वर्षापासूनअतिक्रमण झाले होते. हा रस्ता शेजारील जिल्ह्यांना जोडला असल्याने यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे गावकरी व भावीक भक्त तसेच पंचक्रोशीतील नागरिक त्रस्त झाले होते.

आ. बालाजी कल्याणकर यांनी दोन वर्षापूर्वी स्वतःच्या जन्म दिनाच्या कार्यक्रमात मरळक वासियांना शब्द दिला होता की, तुम्ही मला निवडून द्या. मी मरळक तीर्थक्षेत्र गावच्या मुख्यरस्त्यावरील अतिक्रमण काढून, रास्ता  मोकळा करून रस्त्यावर डांबरीकरण करून देतो. आ. बालाजी कल्याणकर यांनी त्या दिलेल्या  शब्दाची जाण ठेवत, या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. 

जिल्हाधिकारी विपिन इटनकर व तहसीलदार किरण आंबेकर यांच्या मदतीने रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला आहे. मागील चार दिवसांपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. आ. बालाजी कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी विपिन इटनकर, तहसीलदार किरण आंबेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, जिल्हा परिषदेचे उपअभियंता शिवाजी कावळे या अधिकार्‍यांना घेऊन रस्त्याची बुधवारी पाहणी देखील केली.   

यावेळी आ. बालाजी कल्याणकर व जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांचे मरळक गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण मंडळीने हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच मरळक गावचे आजी – माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, विविध पक्षातील पदाधिकारी व गावातील नागरिकांनी हा रस्ता होत असल्याने आ. बालाजी कल्याणकर व जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांचे आभार मानले आहेत.

 यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांच्यासोबत  बालाजी कदम, गंगाधर कदम, जयवंत कदम, सुदाम कदम, शंकरराव कदम, आनंदराव कदम, गणेश शिंदे, नारायण कदम खडकीकर, बळीराम कदम, काशीनाथ कदम, सुग्रीव कदम, गणेश शिंदे पाटील, जगनाथ कदम, भिवाजी कदम, पुरभा कदम, केशव शिंदे,  राणोजी आव्हाड, व्यंकटी कदम, अक्रूर कदम, श्रीराम कदम, श्रीकांत कदम, माधव शिंदे, धनंजय पावडे, केशव पाटील, ॲड. सदाशिव कदम पाटील, माधव कदम, तातेराव कदम, ज्ञानोबा कदम, यांच्यासह गावातील सर्व प्रतिष्ठित, ज्येष्ठ नागरिक, युवा वर्ग तसेच विविध पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी