पुराच्या पाण्याने नुकसान होऊ नये म्हणून तात्काळ उपाययोजना करा
हिमायतनगर| मृग नक्षत्राला झालेल्या पहिल्याच पावसात हिमायतनगर तालुक्यातील मौजे पवना गावामध्ये डोंगरावरील पावसाचे पाणी व नाल्याच्या पुराचे गावात शिरल्याने गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन अनेकांच्या घरात घुसले आहे. त्यामुळे ३० ते ३५ नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी आणि तातडीने पुन्हा पुराच्या पाण्याचा फटका गावकर्यांना बसणार नाही यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी गावकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
डोंगरावरील पावसाचे पाणी व नाल्याच्या पुराचे पाणी गावात शिरून नाल्या जमा होऊन रस्त्यावरून वाहू लागल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे ३० ते ३५ गोरगरीब नागरिकांचे गृहउपयोगी साहित्यासह अन्नधान्याचे नुकसान झाले आहे. पुन्हा अशी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. आणि काही शेतकऱ्यांनी शेतीचे पाणी गावात सोडले आहे, त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने तारंबळ उडाली आहे. स्वत: पाणी काढण्यासाठी लहान बालकासह अबाल वृद्धांना पारेषण व्हावं लागले आहे.
हि बाब लक्षात घेता जुन्या वोलने पाणी न काढल्यास पावसाचे पाणी जमिनीच्या घरात शिरून घर कोसलाउन जीवित हानी व जीवनावश्यक वास्तूचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हि बाबा लक्षात घेता कायमस्वरूपी पुराच्या पाण्याला वाट मोकळी करून देण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या निवेदनावर सुभाष बालपेलवाड, साईनाथ कप्पलवाड, परमेश्वर मुटगुलवाड, राजरत्न राऊत, प्रताप अन्नमवाड, श्रीकांत राऊलवाड, किशन सिल्लेवाड, कमलबाई राऊलवाड, गोदावरीबाई सोलापूरवार, भोजन्ना दुधेवाड, गंगाधर जंगीलवाड, इराप्पा अक्केमवाड, आदींसह ५० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.