हिमायतनगर| सरसम निवासी छायाचित्रकार पुंडलिक कदम यांच्या दुचाकी म्हसोबा नाल्याजवळील मोतेवार यांच्या शेतानजीक ठेवलेली असताना अज्ञात चोरटयांनी चोरून नेली आहे.
फिर्यादी पुंडलीक माधवराव कदम यांची हिरो होंडा स्पलेंडर प्लस कंपणीची मोटार सायकल क्रमांक एमएच-26/एव्ही-4920 किंमती 40,000/-रुपयाची दुचाकी म्हसोबाच्या नाल्याजवळ किनवट ते भोकर रोडवर दि.10 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास रोडवर सोडुन शेतात गेला असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली. त्यांनी दिलेल्या फिर्यादवरुन हिमायतनगर पोलीस ठाण्यात कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास पोहेकॉ.1795 सुदाम ठाकरे हे करीत आहेत. यापूर्वी हिमायतनगर शहरातून गणेश चौकात कामानिमित्त गेलेले एका पोलिसांची गाडी अज्ञात चोरटयांनी चोरून नेली. तसेच डॉ.गायकवाड यांच्यासह शहरातील मुख्य बाजारपेठेतून अनेक दुचाकिय चोरीला गेल्या आहेत. मात्र अद्याप एकही चोरीचा तपास लागला नसल्याने पोलिसांसमोर दुचाकी चोरासह घरफोडी करणार्यांना ताब्यात घेण्याचं मोठा आवाहन उभं आहे.