लोहा| पोलीस प्रशासनात आता उच्च विद्याविभूषित अधिकारी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरती होत आहेत.संवेदशील व सामाजिक दायित्व जोपासणाऱ्या अधिकाऱ्यामुळे ' एकोपा वाढीस लागतो आहे. असेच एक संवेदनशील पोलीस निरीक्षक यांनी जुन्या लोह्यातील गॅस सिलेंडर स्फोटात उध्वस्त झालेल्या कुटुंबियाना आर्थिक मदत केली" काळजीत असलेल्या बडेसाबच्या चेहऱ्यावर " संतोष' पाहायला मिळाला. पण त्याचा कोणताही गाजावाजा होऊ दिला नाही.
गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जुन्या लोह्यातील नवी आबादी येथील बडेसाब भातनासे कुरेशी यांचे घर गॅस सिलेंडरमुळे उध्वस्त झाले यात सर्व घरातील धान्य ,जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, गटनेता करीमभाई शेख यांचा हा प्रभाग घटना कळताच ते मदतीला धावले. जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर, आ श्यामसुंदर शिंदे, माजी आ रोहिदास चव्हाण, उपजिल्हाधिकारी पी एस बोरगावकर, तहसीलदार विठ्ठल परळीकर, उपनगराध्यक्ष शरद पाटील ,प स सदस्य नवनाथ बापू चव्हाण , यासह मान्यवरांनी आपतिग्रस्त कुटुंब प्रति संवेदना व्यक्त करीत मदतीसाठी हात पुढे केले.
या सगळ्या भाउ गर्दीत ' लोह्याचे संवेदनशील पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी या आपतिग्रस्त कुटुंबाला भेट दिली .स्फोट कसा झाला याची बारकाईने नोंद करून घेतली. घरातील सर्वच संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले .सामजिक बांधिलकी जपणारे अधिकारी पोलीस प्रशासनात येत आहेत दंडुक्या ' ऐवजी ' दंडात्मक' कार्यवाही करीत "खल निघृनालय' केले जात आहे. अवघ्या दीड दोन महिन्यातच लोहा शहर व परिसरात त्याची गुन्हेगारावर वचक बसविली तर '.सद् रक्षणालय' ब्रीद पाळले जात आहे.
नवी आबादी भागातील बडेसाब याचे घर गॅस सिलेंडर स्फोटमुळेउध्वस्त झाले .घटनास्थळी हे पाहताच पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी तात्काळ आर्थिक मदत केली.पंचनाम्याला गेले ..आर्थिक मदत करून " खाकी वर्दी" गेले असा संदेश लोकांत गेला .पोलीस निरीक्षक तांबे यांच्या मदतीला हात या आपतिग्रस्त कुटूंबाच्या चेहऱ्यावर "संतोष " फुलविणार ठरला.,पण प्रसिद्धी पासून ते दूर राहिले ."खाकी "च्या या सामाजिक दायित्वाचा सकारात्मक संदेश गेला.