भोकर| वर्ल्ड व्हिजन इंडिया व आरोग्य विभाग भोकरच्या वतीने ध्वनीक्षपकाद्वारे रिक्षावरून कोरोना संसर्ग टाळन्याच्या जनजाग्रती अभियानाची प्रशंसा करून उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी आपल्या हस्ते हिरवी झेंडी दाखून दि .११ जुन रोज शुक्रवारी सकाळी १०=३० वाजता शुभारंभ केला .
यावेळी ग्रामिण रूग्णालयाचे अधिक्षक डॉ . अशोक मुंडे, डॉ . साईनाथ वाघमारे , आरोग्य सेवक सत्यजित टिप्रेसवार, वर्ल्ड व्हिजनचे प्रकल्प संचालक श्याम बाबु पट्टापू, सत्यन्द्र कुमार कनासिया, इमा गावीत, प्रकाश फुलझेले, विनोद घोडके,करण मेशन, बाबुराव सोनकांबळे, आदींची उपास्थिती होती .कोरोना संसर्ग टाळन्यासाठी वर्ल्ड व्हिजन इंडिया व आरोग्य विभाग यांच्या वतीने भोकरशहर व तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी, तांडा येथे पाच अॅटोरिक्षावरून तीन दिवस ध्वनीक्षेपकाद्वारे कोरोना संसर्गाची काळजी न करता सावध रहा.
खोकला ताप व श्वास घेण्यास त्रास होणे लक्षणे दिसताच त्या व्यक्तिशी संपर्क टाळून त्याचा उपचार करा. शिंकतांना, खोकलतांना आपल्या नाकातोंडावर रुमाल धरा, मास व अंडी पूर्णपणे शिजऊंन घ्या, माक्स वापरा कोरोना टाळा. या आशयाची क्लीप वाजऊन गावागावातीत नागरिकांना ऐकऊन सतर्क केला जानार आहे . प्रत्येकांनी कोरोना टाळण्याची व काळजी घेण्याची जनजाग्रती करण्यात येणार असून प्रकल्प अधिकारी श्याम बाबु यांनी नागरीकांच्या आरोग्यासाठी लाखो रुपयाच्या अनेक वस्तुंचा आरोग्य विभागासपुरवठा केला आहे व यापुढेही पुरवठा करणार असल्याचे सांगितले .