मरवाळी येथील संगणक परिचालकावर शिस्त भंगाची कारवाई -NNL

गटविकास अधिकाऱ्यांने काढले कामावरून कमी करण्याचे आदेश



नायगाव| रामेश्वर दिगंबर वजीरगावे आपले सरकार सेवा केंद्र चालक ग्रामपंचायत मरवाळी,मरवाळी तांडा,अलुवडगाव ता.नायगाव जि.नांदेड याला नियुक्त केलेल्या ग्रामपंचायतीचे शासन निर्णयानुसार १) PES (panchayat Enterprise Suit) 11 core application ( priyasoft, areaprofiler, NPP,Training Management,Plan Pluse, Action Soft, Assect Directery), 2) G2G Services (eGramseft) 1 ते 33 नमुने, ३) G2C १ ते १९ दाखले, ४) G2C आणि B2C (नागरी सुविधा, जातीचे, उत्पन्नाचे दाखले,MSEB बिल भरणा इतर ४२०+ सुविधा) देणे हे अपेक्षित कामकाज विहित वेळेत परिपूर्ण करणे हि त्याची जबाबदारी होती.

याबाबत रामेश्वर दिगंबर वजीरगावे याला कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्यामुळे ग्रामपंचायतीस दैनदिन कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत.अकार्यक्षमतेमुळे आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत ग्रामस्थांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा यावरही त्याचा परिणाम झाला आहे. व यास स्वतः जबाबदार असल्याने दि. 07/12/2020 रोजी सुनावणीस बोलाविण्यात आले असता उपस्थित राहुन स्वतः लेखी दिली होती.परंतु कामात कोणतीही सुधारणा दिसून आली नाही.काम न करण्याचे वर्तन जाणीवपूर्वक केले आहे व कोणत्याही आज्ञावलीचे काम स्वतः पूर्ण केलेले नाही तसा अहवाल पाहवता समजले आहे. व या कार्यालया कडून वेळोवेळी नोटीसा देऊनहि या कार्यालयास खुलासा सादर केलेला नाही.

सबब कारणी मरवाळी,मरवाळी तांडा,अलुवडगाव ग्रामपंचायतीचे विविध online लेखे नोदविण्याचे कामकाज विहित कालावधीत व कालावधी नंतर देखील केले नसल्याने महाराष्ट्र शासन आपले सरकार सेवा केंद्र मधील शासन निर्णय शिस्त भंग बाबत शासन परिपत्रक आसक- २०१७ प्र.क. ९२/आपले सरकार कक्ष, दिनांक १३/ १०/२०१७ नुसार ग्रामपंचायत मरवाळी,मरवाळी तांडा,अलुवडगाव केंद्र चालक पदावरून दिनांकापासून 17/05/2021 पासून कमी करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी