एसपींच्या निवास्थानी निघालेल्या सापाला निर्मनुष्य ठिकाणी सोडलं
निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी सापाला मारू नका
नांदेड, अनिल मादसवार | नांदेड जिल्हयाचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या निवासस्थानी नाग जातीचा 4 फुटी विषारी साप आढळून आला. त्याच्यापासून कोणाच्याही जीवाला धोका होऊ नये म्हणून त्या विषारी सापाला पकडून निर्मनुष्य ठिकाणी सोडून दत्ता गायकवाड यांनी जीवदान दिले आहे.
आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या घरी नाग जातीचा आलोव हा 4 फुटी विषारी साप आढळून आला. हि माहिती मिळताच HC/1460 दत्ता गायकवाड नेमणूक पोलिस श्वान पथक, नांदेड यांनी त्यांचे सहकारी महेश बरबडेकर यांच्या मदतीने सापाला मोठ्या शिताफीने पकडले. आणि कोणाच्याही जीवाला धोका होऊ नये म्हणून त्या विषारी सापाला निर्मनुष्य ठिकाणी सोडून जीवदान दिले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पावामुळे बिळातील बाहेर येताहेत, त्यामुळे कुणीही घाबरून न जाता कुठंही साप निघाल्यास त्याला न मारता जवळील सर्पमित्राला बोलवा. कारण वन्यजीवांमध्ये सापाला मोठे महत्व आहे, साप हा मानवाचा शत्रू नसून मित्र आहे. तो निसर्गाचे संतुलन राखण्यास मदत करतो त्याला कधीच मारू नका असे आवाहन त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केले.