हिमायतनगर, अनिल नाईक| तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सर्व धार्मिक स्थळे सुरु करून भाविकांच्या भावनांचा आदर करावा. आणि नांदेड जिल्ह्यातील भोकर सोडले तर वंचित असलेल्या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून देऊन आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा असे मत तथा मागणी भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक श्री श्याम भारती महाराज यांनी केली.
ते सोमवार दि.रोजी २८ हिमायतनगर येथे भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी प्रथमतः त्यांनी येथील आराध्य डावीत श्री परमेश्वर मंदिरास भेट देऊन मंदिर बंद असल्याने श्रीचे मुखदर्शन घेतले. त्यांनतर भाजप जनता पार्टीच्या कार्यालयात दाखल होऊन भाजपच्या कार्यकर्त्यांसमवेत धर्म - अध्यात्म, शेतकरी हिताच्या बाबतीत संवाद साधला आणि कार्यकर्त्यांना सामाजिक धार्मिक कायासाठी स्वतःला झोकून देऊन भाजपचे हात बळकट करावे असे आवाहन केले.
नुकतीच त्यांची भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक म्हणून नेमणुक झाली. त्यानंतर पहिल्या भेटीत समिती गठीत करण्यासंदर्भात चर्चा केली, शासनाची कुठं गायरान जमीन असले तर गुरुकुल आश्रमासाठी उपलब्ध करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना भेटून याबाबतीत निर्णय घ्यावा असे सुचविले. यावेळी श्याम भरती महाराज यांचा हिमायतनगर येथील भाजपा आध्यत्मिक आघाडी तालुका अध्यक्ष कांता गुरू वाळके यांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आल. याप्रसंगी त्यांच्यासोबत अनेकजण उपस्थित होते. कोरोना महामाईच्या मागील काळापासून सर्व धर्माचे धार्मिक स्थळे बंद असल्याने भाविकांच्या आस्थेवर असलेल्या भावनांचा हिरमोड होत आहे. या भयानक संकटाच्या काळात भगवंताकडे साकडे घालून नतमस्तक व्हावं म्हंटलं तर सर्व मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारे यासह सर्व धर्माची धार्मिक स्थळे बंद असल्याने नागरिकांच्या भावनांना ठेच पोहचत आहे. आता तर कोरोनाचा उद्रेक संपलेला आहे, त्यातच पावसाळ्याच्या सुरुवातीपासून हिंदू धर्माच्या सण-उत्सवाची रेलचेल सुरु झाली आहे. या काळात महिला मंडळींना देवी-देवतांचे दर्शन, धार्मिक पूजा विधी करायला कुठं जागा राहिली नाही.
त्यामुळं परंपरेपासून चालत आलेले धार्मिक रीती रिवाज मोदीस निघण्याच्या वाटेवर दिसत आहेत, सरकार असे करून नागरिकांना एकमेकांपासून आणि आता देवी-देवतेवर असलेल्या अनास्थेपासून दूर ठेवण्यासाठी मंदिरे खुली करण्यासाठी टाळाटाळ करते कि काय अशी शंका यायला लागली आहे. तेंव्हा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी तथा उद्धव ठाकरे सरकारने सर्व धर्मियांच्या भावनांचा आदर करून तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मंदिरे भाविकांसाठी खुली करावी. तसेच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गतवर्षी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पीकविमा भरला. मात्र विमा कंपनीने केवळ भोकर सोडले तर इतर सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकविम्यापासून वंचित ठेवले आहे. त्या कंपन्यांना तातडीने नुकसानग्रस्त शेतकर्यांना पीकविमा मंजूर करून देऊन कोरिणामुळे आर्थिक संकटाने डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांना हातभार लावावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी भाजपा युवा मोर्चा ता. अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, कृउबाचे संचालक किशोर रायेवार, वामनराव पाटील मिराशे, हनुसिह ठाकूर, बालाजी ढोणे, गंगाधर मिरजगावे, संजय कुरमे, निलेश चटने, विठ्ठल गुंडाळे, प्रशांत ढोले, अनिल मादसवार, अनिल नाईक, विष्णू जाधव व ईतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.