धानोरा ज. येथे शेतकरी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन -NNL


हिमायतनगर,
अनिल नाईक| पारंपारिक शेती सोडून आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी पैनगंगा शेतकरी बचत गट धानोरा ज. गटाकडून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर सोमवर दि. २८ रोजी ठेवण्यात आले आहे. या शिबिराचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन बचत गटाच्या अध्यक्ष सचिव यांचे कडुन करण्यात आला आहे.


हिमायतनगर तालुक्यात बहुतेक शेतकरी कोरडवाहू शेती करतात ही सर्व शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेती करीत असतांना अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने कापूस सोयाबीन हीच पिके घेतात. याला तंत्रज्ञानाची जोड न लावता पारंपारिक शेती केल्यामुळे शेती परवडेनाशी झाली आहे. शेती परवडण्यासाठी पैनगंगा शेतकरी बचत गट धानोरा पुढे सरसावला असून शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजित केल आहे. दिनांक 28 सोमवारी 11:00 वाजता श्याम माऊली यांचे शेतात शेतकऱ्यांनी हजर राहून कार्यक्रमातील मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पैनगंगा शेतकरी बचत गटाच्या सर्व सदस्यांनी केला आहे. या शिबिरामध्ये पुणे येथून शेतीविषयात तज्ञ असलेले शास्त्रज्ञ मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.


कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार माधवराव पाटील जवळगावकर उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुण्यां मध्ये उपविभागीय कृषी अधिकारी किनवट डीएम तामसकर, तहसीलदार डी एन गायकवाड, गटविकास अधिकारी एस एन मांजरमकर, तालुका कृषी अधिकारी व्ही आर चन्ना, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर यु बी सोनटक्के, महावितरण चे अभियंता पी बी नरनवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, प्रमुख मार्गदर्शक दैनिक लोकपत्र चे संपादक गणेश जोशी मोहगनी वृक्ष लागवड याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी डॉक्टर देविदास देशमुख शाश्वत गट शेती या विषयी हितगुज करतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष शंकरराव शिंदे, उपाध्यक्ष लालताप्रसाद जयस्वाल, सचिव श्याम गडमवाड, सचिव गौतम तुळसे, व पैनगंगा शेतकरी बचत गट धानोराच्या सर्व सदस्यांनी केल आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी