स्थानिक प्रवाशी व नागरिकांची मागणी
हिमायतनगर, अनिल नाईक| कोरोना संसर्गजन्य महामारीच्या रूग्ण संख्येत घट निर्माण झाल्याने रेल्वे प्रशासनाने इंटरसिटी अदिलाबाद ते नांदेड रेल्वे गाडी सुरू केली आहे. परंतू अगोदर तिकीट रिझर्वेशन्स करण्याची अट घालून दिली. असल्याने प्रवाश्यांना एकदा तिकीट काढण्यासाठी व नंतर प्रवास असा दुहेरी वेळ घालवावा लागत असल्याने प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत आहे. म्हणून प्रवाश्यांची गैरसोय लक्षात घेता. रेल्वे प्रशासनाने जनरल तिकीट खिडकी चालू करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय देशपांडे, इरफान खान यांनी केली आहे.
कोरोणा संसर्गजन्य महामारीच्या पाश्र्वभूमीवर गेल्या 22 मार्च 2020 पासून रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. गत काही दिवसांपासून कोरोणाची रूग्ण संख्या बर्याच प्रमाणात कमी झाली असल्याने रेल्वे प्रशासनाने हळू हळू काही मोजक्या रेल्वे गाड्या चालू केल्या आहेत. या मध्ये आदिलाबाद ते नांदेड दरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेस ही महत्त्वपूर्ण रेल्वे गाडी सुरू करण्यात आल्याचा समावेश आहे. या मार्गावर प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. परंतू रेल्वे प्रशासनाने अगोदर तिकीट रिझर्वेशन्स करण्याची अट घालून दिलेली आहे. या मध्ये प्रवाश्यांना वेळ आणी अधिकचा पैसा वाया जात आहे. मग नाईलाजास्तव प्रवाशी टिसी तिकीट तपासनीस यांना दंडपावती भरून देवून प्रवास करत आहेत . या बाबींकडे रेल्वे विभागांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष वेधून जनरल तिकीट खिडकी चालू करून प्रवाश्यांची गैरसोय थांबवावी. अशी मागणी उदय देशपांडे, यांच्यासह रेल्वे प्रवाश्यांतून पुढे आली आहे.
कोरोणा संसर्गजन्य महामारी ची तीव्रता आता कमी जाणवत असल्याने शासनाने प्रतिबंध शिथिल केले आहेत. आता हळू हळू जनजीवन पुर्व पदावर येत आहे. गेल्या 22 मार्च 2020 पासून नागरीक बाहेर निघण्यासाठीचे निर्बंध असल्याने घरीच थांबून होते. आता लाॅकडाऊन चे नियम हटविल्या गेले असल्याने नागरीक घराबाहेर पडत आहेत. रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर व तसेच कमी खर्चात होत असल्याने आपसूकच रेल्वे प्रवाश्यांची गर्दी दिसून येत आहे. या पाश्र्वभूमीवर रेल्वे विभागाने जनरल तिकीट खिडकी चालू करावी अशी मागणी काँग्रेसचे कैलास माने पाटील पोटेकर यांनी केली.