कोणीतरी या जीवघेणा रस्त्याकडे लक्ष देतील का..शेतकरी, नागरिकांचा आर्त टाहो
हिमायतनगर, अनिल नाईक| घारापुर फाटा ते हिमायतनगर हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. तात्काळ दुरुस्ती किंवा नवीन काम झाले तर ठिक आहे. नाहीतर पावसाळ्यात या खराब रस्त्यामुळे विदर्भ - मराठवाडा वाहतूक नक्कीच बंद होणार आहे. तरी संबधित विभागाने लवकर लक्ष दिले नाहीतर विदर्भ - मराठवाडा दळण वळण बंद होईल. अन्यथा या रस्त्याने ये-जा करताना एखाद्याचा बळी जाईल तेंव्हा समबंधित विभागले कुंभकर्णी झोपेतून जागे होईल का..? अशी संतापजनक भावना रस्त्याने ये-जा करणारे नागरिक, शेतकरी बोलून दाखवीत आहेत.
घारापुर फाटा पासून पुढे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असल्याने मोठा रस्ता झाला आहे. परंतु हिमायतनगर ते घारापुर फाटा 1-2 किमीसाठी वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे. रस्त्याची हि जीवघेणी अवस्था पाहून या रस्त्याला कोणीही वाली नसल्यासारखे झाले आहे. तरी संबधित विभागाने व तालुक्याचे आमदार महोदयांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन लवकर रस्त्याचे काम करून घ्यावे किंवा तूर्त दुरुस्ती करून घ्यावी. अशी मागणी जोर धरत आहे.
गेल्या दोन वर्षपासून या रस्त्याची अशी दयनीय अवस्था असताना याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे अल्पसा पाऊस झाला कि, या रस्त्यातील खड्ड्यात प्रचंड वाढ होत आहे. परिणामी रत्स्याने ये-जा करताना दुचाकीस्वार, शेतकरी, जीप, कारचे चालक व प्रवाशी जीव मुठीत धरून रस्ता केंव्हा संपतो याची वाट पाहतात. आजघडीला नुकत्याच झालेल्या पावसाने या रस्त्यावर अक्षरशः काही ठिकाणी तळे साचले आहे. तर या खड्डेमय रस्त्याने जाताना पुढील चांगला रस्ता गाठण्या अगोदर घसरगुंडी होऊन तळ्यात पोहावे लागेल कि काय..? अशी भावना वाहन चालकाला येते आहे.
मागील काळात हा रस्ता मंजूर झाला अश्या वावड्या उठविण्यात आल्या. खरोखर रस्त्याला मंजुरी मिळाली असले तर रस्त्याचे काम का.. केले जात नाही..? असा प्रश्न या भागातील शेतकरी विचारीत आहेत. तसेच हा रस्ता इच्छापूर्ती वरद विनायक मंदिराकडे जात असल्याने दर महिन्याला चतुर्थी आणि इतर रोजी दर्शनासाठी ये - जा करणाऱ्या महिलांना अत्यंत त्रासदायक ठरत आहे. या रस्त्याची कटकटी कधी संपणार अश्या शब्दात बोलत महिला मंडळींकडून राजकीय नेत्याच्या नावाने लाखोली वाहिली जात आहे. हि बाब लक्षात घेता तात्काळ या रस्त्याचे काम मार्गी लाऊन संभाव्य अपघात व एखाद्या व्यक्तीच्या निधनाची घटना होण्यापूर्वी खड्डेमय रस्त्यापासून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी केली जात आहे.