पावसाळ्यापूर्वी रेती चोरी, साठेबाजी व वाहतुक करण्याच्या प्रकाराला ऊत -NNL

जप्त रेतीसाठ्याचा लिलाव कधी होणार; लिलावापूर्वी रेतीसाठे गायब होण्याची शक्यता 



हिमायतनगर| मागील २० दिवसाखाली शिवसैनिक रामा गुंडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या सूचनेनंतर हिमायतनगरचे तहसीलदार, मंडळ अधिकारी यांनी दिघी, कोठा, धानोरा, बोरगडी, पळसपूर, आदी भागात रेतीचे साठेबाजी करण्यात आलेले शेकडो ब्रास साठे जप्त केले. मात्र अजूनही या रेती साठ्याचा लिलाव महसूल प्रशासनाने केला नसल्याने जपत केलेल्या रेती साठ्यातील वाळू चोरीला जाण्याची शक्यता बळावली आहे. एवढेच नाहीतर रेती साठे जप्त झाले तरी ताडपत्री, मेणकापडाने झाकून ठेवलेले अन्य रेतीचे साठे प्रशासन कधी जप्त करणार असा प्रश्न पर्यावरण प्रेमी विचारीत आहेत. कारण आणखी व्हावा तास पाऊस झाला नसल्याने पावसाळ्यापूर्वी रेतीची चोरी व शहरातून वाहतुक करण्याच्या प्रकाराला ऊत आला आहे. महसूल अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या नाक्कावर टिचून राजरोसपणे शहरातील बांधकाम धारकांना सकाळपासून ते रात्रत्रभर विक्रीसाठी रेती घेऊन येणाऱ्या वाहनाच्या संखेवरून स्पष्ट होत आहे.

विदर्भ - मराठवाड्याच्या सीएमवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या कामारी, दिघी, विरसनी, घारापुरी, रेणापूर, कोपरा, पळसपूर, डोल्हारी, एकंबा, कोठा, कोठा तांडा, बोरगडी, धानोरा, वारंगटाकळी आदी ठिकाणच्या रेती धक्क्यावरून राजकीय वरद हसत असलेल्या काही रेतीचोरानी महसुलाचे त्या-त्या सज्जाचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, काही पोलीस पाटील व सरपंचांना हाताशी धरून  जेसीबी व मजुरांच्या साहाय्याने रात्रंदिवस रेतीचे उत्खनन करून साठेबाजी केली. आणि गरजूना अव्वाच्या सव्वा दराने विक्री करून अल्पावधीत मालामाल होण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यासाठी शेकडो ट्रैक्टर, टिप्पर चालक - मालकाने ठिकठिकाणी मनुष्यबळ तैनात करून पैनगंगेची अब्रू लुटल्याप्रमाणे रेतीचा अमाप असा उपसा केला आहे.



हि बाब आजही पैनगंगा नदीकाठावरील रेती धक्क्याच्या आजुबाजुंचे "ड्रोन कॅमेऱ्याने" चित्रण केल्यास ठीक -ठिकाणी असलेल्या रेतीचे साठे अथवा उचलण्यात आलेल्या जागेवर पसरलेल्या रेतीच्या अंशावरून स्पष्ट होते आहे. हा चोरीचा गोरखधंदा राजरोसपणे चालू असल्याची माहिती संबंधित गावातील काही जागरूकानी जिल्हाधिकारी, एसडीओ, तहसीलदार, मंडळ अधिकारी याना लेखी व तोंडी तक्रारी द्वारे दिली. मात्र पावसाळा कमी होतच सुरु झालेल्या या सोन्याचे अंडी देणाऱ्या रेतीच्या धंद्याकडे महसूलच्या अधिकाऱ्यांनी महिनेवारी हप्ता ठरून घेऊन चक्क शासनाला चुना लावणाऱ्या टोळीसोबत हातमिळवणी केली होती. त्यामुळे बिनदिक्कतपणे वाळू माफिया वाळूची चोरी करून मनमानी भावाने गरजू घरकुलधारकांना विकत होते अशी माहिती वाळूच्या धंद्यात सहभागी असलेल्या एका नुकसानग्रस्त वाहन चालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर पत्रकारांशी बोलताना दिली आहे.   

साहेब शहरातील सीसीसीटीव्ही फुटेज तपासून वाहनांवर करावी करा - राम गुंडेकर

नदीकाठावरील दिघी, पळसपूर, कोठा, धानोरा, वारंगटाकळी येथील रेतीघाटाची एटीएस मशीनद्वारे तपासणी करावी, दिघी रेती घाटातून दि.१३,१४, १५ रोजी मध्यरात्रीला शहरात आलेल्या पळसपूर चौक ते रुख्मिणी नगर दरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून वाहन चालक - मालकावर फौजदारी कार्यवाही करावी. ईटीएस मशीन मोजणींनंतर येणारी महसुलाची रक्कम संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी यांचे मिळकतीतून कपात करण्यात यावी, तक्रारीनंतर अल्प साठ्यावर कार्यवाही करून बहूतांश साठे माफियांना मोकळे सोडण्यात आले. याचा अहवाल देण्यात यावा, शासन नियम १९६६ चे कलम ४८(७) चा भंग करत रेती चोरी करणार्यांना अभय देत स्वार्थ साधणाऱ्याची चौकशी करून त्यांना बडतर्फ करावे. या मागणीसाठी तक्रारकर्ते तथा कट्टर शिवसैनिक रामराव गुंडेकर सरसमकर यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. केवळ लेखी आश्वासनाने उपोषण थांबविले मात्र अजूनही याबाबत कोणतीही चौकशी झाली नाही. आणि उलट रेती चोरांचा गोरखधंद्याला मंडळ अधिकारी, तलाठी अभय देत स्वार्थ साधत आहेत. एवढंच नाहीतर मोठ्या परमनंट रेतीची वाहने हिमायतनगरात दिवस रात्र येत असताना रेतीच्या धंद्याला लगाम लावण्यात महसूल प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यासाठी शहरातील सर्वच ठिकाणच्या सीसीसीटीव्ही फुटेज तपासून रेती वाहतूक करणाऱ्या सर्वच वाहनांवर जप्तीची कार्यवाही करावी अशी मागणी राम गुंडेकर यांनी केली आहे. 

स्थापन केलेले बैठे पथक नवलच; रेतीची वाहतूक व विक्री सुरूच   



अवैद्य गौणखनिज उत्खननावर आळा बसावा व शासनाचा महसूल वाढावा या दृष्टिकोनातून हिमायतनगर तालुक्यांतर्गत सर्व रेती घाटावर बैठे पथक स्थापन करण्यात आले. संबंधित पथक प्रमुख यांनी त्यांचे सहाय्यक पथक प्रमुख समवेत सकाळी ८ पासून ते दुसरे दिवशी सकाळी ८ पर्यंत हजार राहून हिमायतनगर तालुक्यात अवैद्य गौण खनिज उत्खनन/ वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्यावी व अवैद्य उत्खनन / वाहतूक / साठा होत असल्यास आवश्यक कार्यवाही करावी असे आदेश दि.०१ जानेवारी ते ३१ दिसेमवार २०२१ पर्यंतच्या काळासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी जारी केले. मात्र याची हिमायतनगर तालुक्यात अंमलबजावणी होत नसल्याचे सुरु असलेल्या वाळू तस्करी व विक्रीच्या गोरखधंद्यावरून दिसते आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी