हदगाव नगरपालिकेचा भोंगळ कारभारामुळे बसस्थानक घाणीच्या विळख्यात -NNL

 


हदगाव, शे चांदपाशा।
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका बस स्थानक परिसर घाणीच्या विळख्यात आला आहे. यास कारणीभूत नगर परिषदेचा नाकर्तेपणा ठरला आहे. या घाणीच्या साम्राज्यामुळे सुरक्षित प्रवासाची हमी असलेल्या प्रवाश्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यास जबाबदार कोण असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे.  

हदगाव तालुका हे विदर्भ  - मराठवाड्याच्या सीमेवरील मोठे शहर आहे. तालुक्याच्या मुख्य ठिकाणी मध्यवर्ती भागात एस ती महामंडळाचा प्रवासी थांबा म्हणजे बसस्थानक आहे. येथील इमारत प्रवाश्यांच्या सोयीसाठी भव्य दिव्य असली तरी सुविधांची वानवा आहेत. आता तर पावसाळ्याचे दिवस असल्याने काल झालेल्या पहिल्याच पावसाच्या जोरदार आगमनाने शहरातील नाल्याची सर्वच घाण या बस्थानाक आवारात आल्याने पूर्ण बस स्थानक परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने प्रवाशी व येथील कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अगोदरच कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे आणि त्यात घाण व दुर्गंधीचा असा त्रास म्हणजे प्रवाश्याना जाणीवपूर्वक आजारी करण्याचा ठेकाच जणू हदगाव नगर परिषदेने घेतला कि काय..? असा प्रहसन येथे येणाऱ्या प्रवाश्यां पडला आहे. प्रवाश्याना अक्षरशः घाणीच्या विळख्यातून पाय ठेवत बाहेर पडण्याची वेळ आली आहेत. तेंव्हा प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन सर्व सामान्य प्रवाशी यांना दर्जेदार सुविधा उपलबध करून द्यावी अशी मागणी होत आहे.

परिवहन विभागाने हात केले वर...

याबाबत आमच्या प्रतिनिधीनी येथील आगर व्यवस्थापक यांना विचारणा केली असता त्यांनी सरळ सरळ सांगितले की, शहरातील सर्व नाल्याचे पाणी येथून जात असल्याने तेच पाणी व घाण बस स्थानक परिसरात शिरली आहे. याबाबत आम्ही नगर पालिकेच्या संपर्क करून सूचना केल्या लवकरच घाण साफ करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे. पण यात लाखो रुपयांचा महसूल गोळा करणाऱ्या प्रवाशी व कर्मचारी यांच्यासाठी एकही रुपया खर्च करणार नाही. हे काम स्थानिक पातळीवरचे आहे असा सावध पवित्रा घेत त्यांनी हात वर केले आहे. यामुळे सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका घेणारी एस .टी. महामंडळ मात्र कोरोनाच्या काळात प्रवाशांच्या मुळावर बसली आहे का..? अशी चर्चा बस स्थानक परिसरात होत होत आहे. याबाबत स्थानिक नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन स्वच्छतेवर लाखो खर्च करूनही घाण अशी का पसरतेय याचा शोध घेऊन बस स्थानक परिसरातील प्रवाश्याना कायमस्वरूपी घाणीच्या विळख्यातून बाहेर काढन्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी