नांदेड| कोवीड-19 या वैश्विक महामारीचे संकट संपूर्ण देशावर असताना एमजीएमच्या तरुण पिढीने कॅम्पस प्लेसमेंट मध्ये बाजी मारली. विद्यार्थ्यांनी या लॉकडाऊनचा सदुपयोग करून मागच्या मे महिन्यामध्ये अॅक्सेंचर कंपनीकडून ऑनलाईन पद्धतीने रेक्रूटमेंट प्रोसेसमध्ये उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदविला त्यांनी या प्रोसेससाठी अत्यंत मेहनतीने तयारी केली होती.
रेक्रूटमेंट टेस्ट, टेक्निकल इंटरव्ह्यू आणि एच आर इंटरव्ह्यू यांना अगदी आत्मविश्वासाने सामोरे जाऊन संधीचे सोने केले त्याचाच परिणाम म्हणून एमजीएम महाविद्यालयाच्या 17 विद्यार्थ्यांनी अॅक्सेंचर कंपनी कडून 4.5 लाखांचे पॅकेजचा जॉब मिळाल्याचे पत्र मिळाले. त्यामध्ये संगणक विभागाचे प्रसाद नागठाणे, ऋचा धंपलवार, नम्रता तरोळे, हरिओम लापशेटवार, व्यंकटेश गडपल्लेवार, श्रुती देऊळगावकर, ऐश्वर्या कदम, साक्षी चिद्रावार, श्रद्धा गुंडले, आयेशा फातेमा, तेजस्विनी साखरे, वैष्णवी येरमवार, आयटी विभागाचे पल्लवी डाकोरे, आरती येरावार, हर्षाली गायकवाड, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेले काम्यूनिकेशन विभागाचे वैभवी कुलकर्णी ही त्यांची नावे आहेत. एमजीएम महाविद्यालय सतत विद्यार्थ्यांना डिग्री हातात येण्यापूर्वी त्यांच्या हातात चांगला जॉब असावा यासाठी तत्परतेने काम करत असते. महाविद्यालयाचे शिक्षक है मेंटर म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांचे वारंवार समुउपदेशन करत असतात.
महाविद्यालयातील डायरेक्टर, एचओडी यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्वांच्या सहकार्याने ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलकडून अॅक्सेंचर सारख्या नामांकित कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देत असतात. एमजीएम महाविद्यालय हे नेहमीच चांगल्या उपक्रमांना सहकार्य करत असते संस्थेच्या संचालिका सर्व विभाग प्रमुख आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल संपूर्ण वर्षभरासाठी स्किल डेव्हलपमेंटच्या योजना आखतात. कंपनीच्या गरजेप्रमाणे मुलांना प्रशिक्षित करतात आणि ते प्रशिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यार्यंपत पोहोचावं यासाठी प्रत्येक 20-25 मुलांमागे एक मेंटर नेमतात. प्रत्येक मेंटर सतत व्यक्तिगत पातळीवर विद्यार्थ्याकडे लक्ष देत असतात. या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळेच एमजीएम महाविद्यालयाच्या 17 विद्यार्थ्याना अॅक्सेंचर सारख्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये जॉब मिळाला आहे. आणि त्यांच्या जीवनाची सुरुवात अशी उत्कृष्ट झाली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री कमलकिशोर कदम, संचालिका डॉ. गीता लाठकर, उपप्राचार्य डॉ. शिरीष कोटगीरे, विभाग प्रमुख डॉ. राजूरकर, डॉ. जोंधळे व प्रा. हाश्मी यांनी मनपूर्वक कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे शिवप्रसाद तितरे, मोहम्मद जुनेद, एम.व्ही. मंगलगिरी, आणि आर.एस. यादव यांनी परिश्रम घेतले.