राजीव सातव अमर रहे दिल्याच्या घोषणा.....!
अर्धापूर, निळकंठ मदने| काँग्रेसचे नेते खा.राजीव सातव यांच्या अस्थीकलशाच्या दर्शनासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले. अर्धापूर व पार्डी (म) येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, नागरीकांनी दर्शन घेतले. राजीव सातव अमर रहे च्या घोषणांनी वातावरण सर्वत्र भावनिक झाले होते.
काँग्रेसचे दिल्ली दरबारी वजन असल्याने युवक चे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभा सदस्य, गुजरात प्रभारी यासह विविध जबाबदारी यशस्वीपणे राबविणारे खा.राजीव सातव यांचे अचानक दुख:द निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी ईच्छा असूनही कोरोनाचे वातावरण असल्याने अनेकजन उपस्थित राहू शकले नाही.
त्यामुळे मंगळवारी २५ मे च्या कळमनुरी- अर्धापूर - नांदेड मार्गे अस्थीकलश यात्रेत अनेक गावातील कार्यकर्ते, नागरीकांनी अस्थीकलशाचे दर्शन घेतले. नांदेड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पार्डी (म.) व अर्धापूर येथे तालुक्यातील नागरिकांनी दर्शन घेतले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिदे नागेलीकर, सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे,शहराध्यक्ष राजेश्र्वर शेटे, जिल्हा सचीव निळकंठराव मदने, डॉ.विशाल लंगडे, प्रविण देशमुख, नासेरखान पठाण, धनंजय पाटील, मुसव्वीर खतिब, व्यंकटराव साखरे, उमेश सरोदे, संजय लोणे, गंगाधरराव देशमुख, बाळू पाटील,नागोराव भांगे पाटील, जितेंद्र देशमुख.
अँड.सचीन देशमुख, हनुमंत देशमुख, शकुराव हापगुंडे, सुधाकरअप्पा कावरे, शंकर हापगुंडे, अँड गौरव सरोदे, प्रा.संतोष हापगुंडे, युनुस नदाफ, राजाराम पवार, महेश देशमुख, सोनाजी सरोदे, जाधव, साहेबराव हापगुंडे, कानबा पवार, शेख मकसुद, प्रल्हाद सोळंके, संदीप कावरे, शेख मौला, ज्ञानेश्वर दहिभाते, गजानन हापगुंडे, एजाज मिर्झा, नवनाथ सातपुते, गोविंद गोदरे, इरफान नदाफ, मारोती हापगुंडे, मसाजी कांबळे, अशोक मदने, देविदास कांबळे, माधव बंडाळे यांच्यासह आदीची उपस्थिती होती.