नांदेड| हदगाव/हिमायतनगर तालुक्यात मागील २०२० या खरीप हंगामाचा सोयाबीन व कापासाचा विमा इफ्को (टोकीयो) विमा कंपनीने नामजुर केल्याच्या निषेधार्थ दि ४ जुन रोजी हदगांव तहसिल कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आदोलन करणार आहे. असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनातुन दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सन २०२० मध्ये हदगाव व हिमायनगर तालुक्यात आतिवृष्टीमुळे अंदाजे ७५ टक्के सोयाबीन डँमेज होऊन काळे पडले होते. अनेक शेतात पाणी घुसल्याने व आतिवृष्टी झाल्याने सोयाबीनच्या ढिगांना कोंबे फुटले होते. आश्या परिस्थिती प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करुन सोयाबीनचे पंचनामे करुन शासनाकडे पाठविले होते. शासनाने पण सत्तर ते ऐशी टक्के नुकसान झाल्याचे मान्य करुन आतिवृष्टीचे आनुदान दिलेले असतानाही ईफ्को टोकीयो पीक विमा कंपनीने विमा दिलेले नाही.
शासनाने भरपाई दिली आसतांना ह्या विमा कंपनीचा मुजोरपणा यावरून दिसुन येत आहे. विशेष म्हणजे पालकमंञ्याच्या भोकर तालुक्यात सोयाबीन करिता विमा मंजुर केला. पण हदगाव व हिमायनगर करिता पीक विमा का..? मंजुर नाही. असा प्रश्न दिलेल्या निवेदनात बाबुराव कोहळीकर यांनी उपस्थित केला आहे. शेतक-या विषयी भेदभाव करणा-या या पीक विमा कंपनीच्या विरोधात ४ जुन रोजी तहसिल कार्यालय समोर धरणे आदोलन करण्यात येईल आसा इशारा त्यांनी दिला आहे.