नांदेड| अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी व मराठवाड्यातील उदयोन्मुख युवा नेते खा. राजीव सातव यांच्या अस्थींचे मंगळवार, दि.25 मे रोजी विधीवत पूजा करून श्री काळेश्वर मंदिर परिसरातील गोदावरी नदीच्या पवित्र पात्रात विसर्जन करण्यात आले. या वेळी संपूर्ण राज्यभरातून आलेल्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
खा. राजीव सातव दि. 16 रोजी पूणे येथे एका खाजगी रूग्णालयात निधन झाले होते. त्यांच्यावर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे दि.17 रोजी अग्नीसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज (दि.25) त्यांची अस्थिकलश यात्रा कळमनुरीहून सकाळी 9 वाजता निघाली. आखाडा बाळापूर, अर्धापूर या मार्गाने ही अस्थिकलश यात्रा दुपारी 1 च्या सुमारास श्री काळेश्वर मंदिर परिसरात पोहचली. तत्पूर्वी या अस्थिकलशावर नांदेड तालुक्यात अर्धापूर, शनीपार्डी, सांगवी, विष्णुपूरी आदी ठिकाणी फुले वाहून खा. राजीव सातव यांना अभिवादन करण्यात आले. नांदेड दक्षिणचे आ. मोहनअण्णा हंबर्डे व काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांनी विष्णुपूरी येथे अस्थिकलशास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.
श्री काळेश्वर मंदिर परिसरातील गोदावरी नदीच्या पात्रात विधीवत पूजा करून अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले. या वेळी खा. राजीव सातव यांच्या मातोश्री व माजी मंत्री रजनीताई सातव, पत्नी डॉ. प्रज्ञा सातव, पूत्र पुष्कराज सातव, कन्या तितली सातव यांच्यासह हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड, राज्यमंत्री विश्वजीत कदम, आ.अमरनाथ राजुरकर, आ. मोहनअण्णा हंबर्डे, आ. राजेश राठोड, आ. जिशांत सिद्दीकी, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ.मोहिनीताई येवनकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी खा.सुभाष वानखेडे, माजी आ. हनमंत पाटील बेटमोगरेकर, माजी आ.विजय खडसे, संतोष टारफे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस बी.आर.कदम, ज्येष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, हिंगोली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ, हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष सुधीरअप्पा सराफ, मनपाचे स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, जि.प.चे सभापती संजय बेळगे, अॅड.रामराव नाईक, बाळासाहेब पाटील रावणगावकर.
काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, प्रवक्ते संतोष पांडागळे, शहर उपाध्यक्ष शाम दरक, मनपाच्या महिला व बालकल्याण सभापती संगीता पाटील डक, स्थायी समितीचे माजी सभापती अमित तेहरा, किशोर स्वामी, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, सतीश देशमुख तरोडेकर, डीपीडीसी सदस्य एकनाथ मोरे, धारोजीराव हंबर्डे, बालाजीराव हंबर्डे, उमेश पवळे, संजय मोरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंढेकर, शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, किशोर भवरे, केदार पाटील सांळूके, विठ्ठल पाटील डक, किशन कल्याणकर, संतोष मुळे, शाम कोकाटे, राहूल हंबर्डे, सौ.जयश्री जयस्वाल, सौ.ललिता कुंभार, संदीप सोनकांबळे, हरविंदरसिंघ संधू, विलास हंबर्डे, विश्वनाथ हंबर्डे, जयश्री हंबर्डे, भालचंद्र पवळे, सुरेश हटकर, शंकर शिंदे, साई महाजन आदींची उपस्थिती होती.