हिमायतनगर। येथील, शेतकरी शेख अंसार शेख रफीक अहेमद, यांचे शेतातिल बैल जोड़ी काही दिवसापूर्वी चोरी गेली असता, त्या बाबत त्यांनी हिमायतनगर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती, सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवकते, एएसआय रमेश कांबळे, शेख महेबुब यांनी तपास करून अखेर बैलजोडी चोरास ताब्यात घेतले आहे, पोलिसांच्या कामगिरीमुळे ही चोरी उघडकीस आल्याबद्दल सर्व स्तरांतून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
पोलिसांनी बैलजोडी चोरीच्या तपासला गती दिली मात्र चोरट्यांचा सुगावा लागत नव्हता, अचानक एक का गुप्त खबर्यामार्फत मिळालेल्या महितीच्या आधारे सदर बैल जोड़ी राजवाड़ी येथील पुला जवळ असल्याच समजले. लागलीच पोलिस कानिस्टेबल शेख महेबुब शेख जिलानी त्या ठिकाणी गेले व् सदर बैल जोड़ी जप्त करुण, हिमायतनगर पोलिस स्टेशनला आणली.
तसेच आरोपी शेख सत्तार शेख अमीर वय 25 वर्ष राहणार शब्बीर कालोनी हिमायतनगर, राजेश पेटाजी कामलवाड राहणार हिमायतनगर हल्ली मुकाम येवली तांडा, शेख रहेमान शेख मोइन राहणार हिमायतनगर यांचा चोरीच्या घटनेत समावेश असल्याने त्यांच्या विरूद्ध गु. र. न. 108/2021 कलम 379 भा. द. वि, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान् कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली पीएस आय देवकते, ए.एस. आय. रमेश कांबळे हे करीत आहे.
हिमायतनगर परिसरतील अनेक शेतकऱ्यांचे बैल जोड़या चोरिस गेल्याचे घटना घडल्या होत्या, त्या चोरीचा तपास जैसे थे असून, या चोरट्यांची कसून चौकशी केल्यास अनेक चोरीच्या घटना उघड़किस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बैलजोडी चोरीमध्ये अनेकांचा समावेश असण्याची श्यक्यता असून, रैकेट असल्याची चर्चा होत आहे.