पत्रकारांच्या शिष्टमंडळास उपविभागीय अधिकाऱ्याचे आश्वासन
ते दि.२० में रोजी सायंकाळी ४ वाजता हिमायतनगर येथील तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या महसूल, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असता तालुक्यातील रेती घाटावरून होत असलेल्या अवैद्य रेती उत्खननाच्या तक्रारीला उत्तर देतांना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार डी.एन.गायकवाड, नायब तहसीलदार अनिल तामसकर, गटविकास अधिकारी सुदेश मांजरमकर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पुढे बोलताना डापकर म्हणाले कि, विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठावरून अवैद्य रित्या रेतीचे उत्खनन करण्यासाठी कोणालाही कुठलीही परवानगी देण्यात आली नसताना काहीजण पथकाची नजर चुकवून चोरी करत असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत सर्व तलाठी, मंडळ अधिकारी याना रेतीच्या बाबतीत हलगर्जीपणा न करता कठोर कार्यवाही करून रेती साठे जपत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ग्रामस्थरावर शासन नियमाप्रमाणे स्थापन करण्यात आलेल्या कमिटीकडे सादर साठ्याची जबाबदारी देऊन पोलीस पाटील यांच्याकडेही जप्त केलेला साथ रक्षणाची जबाबदारी देण्यात येईल. रेतीचोरीवर आळा घालण्यासाठी स्थानिक अधिकारी, कर्मचारी अपयशी ठरत असल्याने हदगाव येथील एक विशेष पथक हिमायतनगर तालुक्यात कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले होते. आता स्थानिक कर्मचाऱ्याच्या पथकात बाहेरचे कर्मचारी देऊन नव्याने पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ते पथक कोणत्याही क्षणी नदीकाठावरील रेती धक्याच्या ठिकाणी छापे टाकून कार्यवाही करू शकतात असेही ते म्हणाले.
हदगाव तालुक्यात रेती माफिया विरुद्ध कडक मोहीम राबवून तराफे जाळून टाकून रेती साठे जप्त करण्यात आले. त्याचा धर्तीवर हिमायतनगर तालुक्यातील नदी जवळच्या गावाशेजारी व नदीकाठावरील रेती साठे जपत करून जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने रेतीसाठ्याचे लिलाव केले जाईल असेही उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी सांगितले. यावेळी जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गोविंद गोडसेलवार, अनिल मादसवार, ज्ञानेश्वर पंदलवाड, शुद्धोधन हनवते, राम गुंडेकर, अनिल नाईक, आदींसह अनेक पत्रकार व पर्यावरणप्रेमी नागरिक व तहसील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.