वेळीच उपचाराने म्‍यूकर मायकोसिस आजार होतो बरा - जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे -NNL


नांदेड|
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना म्‍यूकर मायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव अनेक रुग्णांना होताना दिसत आहे. वेळेवर उपचार लाभल्‍यास हा रोग बरा होऊ शकतो. नागरिकांनी म्‍यूकर मायकोसिस या आजाराची लक्षणे आढळल्‍यास तात्‍काळ वैद्यकीय उपचार घ्‍यावेत व कोरोना प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचे पालन करावे असे, आवाहन जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.

म्‍यूकरमायकोसिस एक अति जलद पसरणारा रोग आहे. जबडा, डोळे,नाक आणि मेंदू यांना बाधित करतो. हा रोग अनियंत्रित मधुमेहामुळे व कोरोना उपचारादरम्‍यान स्‍टेराईड किंवा इतर औषधे जास्‍त प्रमाणात शरीरात गेल्‍यामूळे उद्भवतो. ज्‍यांची रोगप्रतिकारक शक्‍ती कमी आहे, अशा व्यक्तींना हा आजार होण्‍याची शक्‍यता जास्‍त असते. चेहऱ्यांचे स्‍नायू दुखणे, चेहऱ्यावर बधिरपणा येणे, डोक्‍याची एक बाजू दुखणे, नाक चोंदणे, नाकावर सूज येणे, नाकपुडीतुन रक्‍तस्‍त्राव, काळपट स्‍त्राव, चेहरा अथवा डोळ्यावर सुज येणे, डोळा दुखणे, एक पापणी अर्धी बंद राहणे, दात दुखणे किंवा हलु लागणे, अस्‍पष्‍ट दिसणे, ताप येणे ही या रोगाची लक्षणे आहेत.

या रोगासाठी पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना कराव्यात. रक्‍तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवावे. कान,नाक,घसा,नेत्र व दंतरोग तज्ञांकडून एक आठवड्यानंतर तपासणी करावी. डॉक्‍टरांनी सांगीतलेली औषधे घ्‍यावीत. दिवसातून दोनदा मिठाच्‍या कोमट पाण्‍याच्‍या गुळण्‍या कराव्यात. टूथब्रश एक महिण्‍यात बदलावा. मास्‍क वरचेवर बदलावा, कापडी मास्‍क रोज धुवावा. फळे भाजीपाला मिठाच्‍या पाण्‍याने स्‍वच्छ पाण्‍याने धूवून घ्‍याव्‍यीत. मातीशी, शेतीशी, कुजलेली झाडे सोबत संबध येत असल्‍यास मास्‍क व फुल बाहीचे शर्ट व ग्‍लोजचा वापर करावा. वैयक्तिक परिसराची स्‍वच्‍छता ठेवावी.

म्‍यूकरमायकोसिस या आजाराची लक्षणे आढळल्‍यास तात्‍काळ नजिकच्‍या दवाखान्‍यात वैद्यकीय उपचार घ्‍यावा. तसेच मास्‍क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दीत जाणे टाळणे या गोष्‍टींचे नागरीकांनी कटाक्षाने पालन करून लस घ्‍यावी असे डॉ शिंदे यांनी स्पष्ट केले. कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्‍यानंतर सुध्‍दा कोविड 19 प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करणे, मास्‍क, सॅनिटायझर यांचा नियमित वापर करणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दीत जाणे टाळावे असेही जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.a

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी