भारतनेट(महानेट) प्रकल्पाच्या दुस-या चरणास (Phase II) प्रारंभ

ग्राम पंचायतीना मिळेल उच्च प्रतीची इंटरनेट जोडणी

हिमायतनगर| केंद्र सरकारच्या  ‘भारतनेट’ या उपक्रमाच्या दुस-या टप्यातील हिमायतनगर  तालुक्यालची सुरूवात तहसिल कार्यालय हिमायतनगर येथे दि.१७ जून २०१९ रोजी मा.श्री एन.बी. जाधव तहसिलदार हिमायतनगर यांचे हस्ते तहसिल कार्यालय हिमायतनगर येथे करण्यात आली.


राज्य शासनाच्या् सामान्यप्रशासन विभागाने फेब्रुवारी २०१८ मध्ये  घेतलेल्या. निर्णयानुसार,  भारतनेट - महानेट प्रकल्प महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांचे मार्फत राबविण्यात येत असून, या प्रकल्पाव्दारे नांदेड जिल्ह्याातील 11 तहसिल कार्यालये व त्या‍अंतर्गत येणारे 964 ग्रामपंचायतीना ऑप्टीकल फायबर नेटवर्क ब्रॉडबॅंडने जोडले जाणार आहेत. ग्रामस्तरावरील नागरिकांना डिजिटल सेवा देउन त्यांना जगाशी जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारव्दाकरे हा उपक्रम सुरु केला आहे. हिमायतनगर तालुक्याातील 52 ग्राम पंचायती या प्रकल्पाप अंतर्गत जोडण्याात येणार आहेत.


प्रकल्पात तालुकानिहाय ग्रामपंचायतीची संख्या भोकर - 67, बिलोली - 73, देगलूर - 96, हदगाव - 125, माहुर- 62, हिमायतनगर - 52, लोहा - 118, मुदखेड - 51, मुखेड -127, उमरी–58, किनवट – 134. उक्त 11 तालुक्यात 3807 कि मी अंतर केबल टाकून 964 ग्रामपंचायाती जोडण्यात येणार असून, हे  काम जिल्ह्या त पूर्ण करण्यातसाठी शासनाव्दामरे स्टरलाईट या कंपनीची निवड केलेली आहे. उपरोक्त शुभारंभ कार्यक्रमांस :- श्री मांजरमकर एस एम,गट विकास अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर, श्री.तामसकर (ना.त), सय्यद(ना.त), गायकवाड(वि.अ), डावरे(न.प), निरज धामणगावे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, ज्ञानेश्वार रांजणे, सय्यद वाजीद, विकास  रावते, बोलबम राय, राम डांगे, विठ्ठल लढे, शिवसाई अनंतवार , कमलेश बालपांडे, साईप्रसाद  गादेवार, प्रकाश कुमार, मुजाहिद खान, नितिन मेहत्रे तालुका व्यतवस्थारपक आपले सरकार सेवा केंद्र, हर्षा मनाम - प्रकल्पर व्यवस्थापक स्टेरलाईट कंपनी इ मान्यवर तसेच नागरीक देखिल या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री निरज धामणगावे यांनी केले व आभार प्रदर्शन  श्री. पाळेकर, अव्वसल कारकुण तहसिल कार्यालय हिमायतनगर यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी