पस सभापती वरील अविश्वास ठरावा वर उद्या विशेष सभा

मारोतराव रेकुलवार यांच्या विरुद्ध 3 सदस्यांचा अविश्वास 
माहूर (नृसिंह न्यूज नेटवर्क) पंचायत समितीचे सभापती मारोतराव रेकुलवार यांच्या विरुद्ध पस च्या 04 सदस्यांपैकी 03 सदस्यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कडे आज दिनांक 14 (मंगळवार) रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.या अविश्वास ठरावा करीता आज दिनांक 23 (गुरवार) रोजी विशेष सभा बोलविण्यात आली आहे.

माहुर पंचायत समितीचे एकुन चार सदस्य आहेत. त्यापैकी 02 काँग्रेस, सेना 01,राष्ट्रवादी 01  असे पक्षीय बलाबल आहे.जमातीतुन एकमेव निवडुन आलेले
राष्ट्रवादी चे पस सदस्य मारोतराव रेकुलवार हे सभापती पदी आरूढ झाले होते.परंतु काँग्रेसच्या दोन सदस्यांनी शिवसेनेच्या एका सदस्याला घेउन जिल्हाधिकारी कडे दाखल केलेल्या अर्जात आमचा विश्वास राहिलेला नाही. सभापती हे महिला सदस्यांना आपमानास्पद वागणुक देतात,सभापती हे पंचायत समितीच्या बैठकीत मांडलेल्या ठरावाची नोंद प्रोसरेडींग ला घेत नाहीत त्यामुळे अविश्वास प्रस्ताव आणत असल्याचे म्हटले होते. या अविश्वासावर चर्चा करण्यासाठी गुरवार 23 रोजी पंचायत समितीच्या सभागृहात दुपारी 2 वाजता विशेष सभेचे आयोजन पिठासिन अधिकारी म्हणून उपविभागीय महसूल अधिचारी  हदगाव यांच्या उपस्थितीत  करण्यात आले आहे.

किनवट नप युतीवर होणार परीनाम 
एकुन चार सदस्य असणाऱ्या माहुर पस मध्ये काँग्रेस चे दोन सदस्य आहेत.त्यांनीच हा अविश्वास ठराव सेनेला सोबत घेऊन आणल असुन, हा ठराव पारित झाल्यास आगामी किनवट नगरपालिकेत होणार्‍या संभाव्य युतीवर याच परीनाम होणार आहे. एका ठिकाणी अविश्वास आणायचा अण् दुसरी कडे मैत्री करायची हे नाटक स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना खटकणारे असुन, नांदेड जिपची युती हि या अविश्वासाचा खेळानंतर ताणनार यात शंका नाही

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी