दारूगोळा तयार आहे, आदेशाची वाट पाहतोय - जाधव

जिल्हाप्रमुख पदासह इतर पदांवरील नियुक्त्या लवकरच

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) नांदेड शहरात शिवसेना संघटनात्मक पातळीवर कमकुवत असल्याचा फटका महानगरपालिका निवडणुकीत बसला. त्यामुळेच शिवसेनेच्या मतांमध्ये घट झाल्याची कबुली शिवसेनेचे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी शुक्रवारी येथे दिली. या पराभवाचे चिंतन आम्ही करीत आहोत, असेही ते म्हणाले. शासकीय विश्रामगृहावर नांदेड उत्तर विभानसभा क्षेत्रातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.


नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी पार पडली. संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, प्रकाश मारावार, शहरप्रमुख दत्ता कोकाटे, नगरसेवक बालाजी कल्याणकर, जि.प. सदस्य बबन बारसे, डॉ. मनोज भंडारी, मुकूंद जवळगावकर, दयाल गिरी, अशोक उमरेकर, बंडू खेडकर, तुलजेश यादव, बिल्लू यादव, बाळू सातोरे, सचिन किसवे, बाळासाहेब देशमुख, जयवंत कदम, माधव पावडे, विजय बगाटे, महिला आघाडीच्या निकिता चव्हाण, श्रीमती संगीता बियाणी, ऍड. जयश्री कंधारे, सरिता बैस आदींची यावेळी उपस्थिती होती.

प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 1 लाख तसेच तालुक्यात 50 हजार सदस्य नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीनंतर संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी दिली. 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी संघटनात्मक बांधणी केली जात आहे. मध्यावधी निवडणुक झाली तरी आमची संपूर्ण तयारी असल्याचे ते म्हणाले. महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे मताधिक्य घटले, यासाठी निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करण्यात आला, हा फॅक्टर कारणीभूत ठरला. याशिवाय शहरातील संघटनात्मक बांधणी कमकुवत होती, त्याचा देखील सेनेला फटका बसल्याची कबुली जाधव यांनी यावेळी दिली. मनपा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे चिंतन आम्ही करत आहोत असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचे उत्तर विभागाचे जिल्हाप्रमुख पद सध्या रिक्त आहे. या पदासाठी 10 जण इच्छुक आहेत, जिल्हाप्रमुख पदासह इतर रिक्त पदांवरील नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येतील, असेही आनंद जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी