नांदेड (रामप्रसाद खंडेलवाल) एका 17 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेला पळवून नेऊ तिच्या सोबत अत्त्याचार करणाऱ्या एका 20 वर्षीय युवकाला विमानतळ पोलीसांनी पुणे येथून पकडून आणले आहे.
नांदेडमधील एका आईने दिलेल्या तक्रारीनुसार तिची 17 वर्षीय बालिका जालनामध्ये आपल्या बहिणीकडे गेली त्या बालिकेची बहिण कांही तरी चित्रपटाचे काम
करीत होती. त्यामुळे तिच्यासोबत काम करणारा युवक अविनाश भगवान राठोड (वय 20) याचासोबत ओळख झाली. या संदर्भाने ओळखीचा फायदा घेत त्या युवकाने त्या बालिकेशी सुत जमविल. दि. 1 नोव्हेंबर रोजी ती नांदेडला आली असतांना त्याने तिला पळवून नेले. पोलीसांनी तपासणी केली असता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलीसांना हे दोघे पुण्यात असल्याची माहिती मिळवली. तेंव्हा विमानतळचे पोलीस निरिक्षक सुभाष राठोड यांनी बालिकेला पळविल्याप्रकरणी अविनाश राठोड विरुध्द गुन्हा दाखल केला. अविनाश राठोडला पकडून पोलीसांनी नांदेडला आणले आहे. आज त्याची कायदेशीर अटक करण्यात आली आहे.
आज पोलीस निरिक्षक राठेाड यांची सहकारी पोलीस बाबा गजभारे, ए.के.राठोड, रामदास सुर्यवंशी, कज्जेवाड, अरविंद गायकवाड यांनी अविनाश राठोडने त्या अल्पवयीन बालिकेला पुण्यात नेऊन तिच्यासोबत अत्याचार केला आहे. म्हणून या गुन्ह्यात बालकांचे लैगिंक अत्त्याचार संरक्षण अधिनियम या कायद्याची वाढ करण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला आहे. यावेळी पोलीस निरिक्षक सुभाष राठोड यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, अटक केलेल्या अविनाश राठोडची आज वैद्यकीय तपासणी करुन उद्या कायदेशीररित्या त्याला न्यायालयात हजर करु असे सांगितले.