भाजपा पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजण इच्छुक

तर संभाव्य उमेदवार लागले प्रचाराला
नविन नांदेड (रमेश ठाकूर) नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग- 19, 20 मध्ये भाजपा पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजन इच्छुक असून अनेकांनी मुलाखतीही दिल्या. तर संभाव्य असलेले उमेदवार प्रचार कार्याला लागले असून मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचाही नविन नांदेड भागात शुभारंभही झाला. भाजपा पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजण इच्छुक तर संभाव्य उमेदवार लागले प्रचाराला
नविन नांदेड (रमेश ठाकूर) नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग- 19, 20 मध्ये भाजपा पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजन इच्छुक असून अनेकांनी मुलाखतीही दिल्या. तर संभाव्य असलेले उमेदवार प्रचार कार्याला लागले असून मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचाही नविन नांदेड भागात शुभारंभही झाला.

नां.वा.म.न.पाच्या हद्दीतील सर्वात मोठा असलेला प्रभाग क्र. 20 वर सर्वच राजकीय पक्षांनी आपले वर्चस्व रहावे यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतांनाच राजकीय पक्षांनाही मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. त्यातल्या त्यात भाजपा पक्षात निवडणूक लढविण्याच्या मोठ्या प्रमाणात संख्या आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच विद्यमान नगरसेवक ऍड. संदिप चिखलीकर व सौ. इंदुबाई शिवाजी घोगरे यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्र्वास ठेवून भाजपा पक्षात प्रवेश केला. त्यानंतर भाजपा पक्षात मोठ्या हालचालींना वेग आला. निष्ठावंत कार्यकर्त्यांसह नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांत एकत्रपणे बैठकी ही झाल्या. ऍड. संदिप चिखलीकर यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा शुभारंभ कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, महानगर अध्यक्ष संतुक हंबर्डे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर व मान्यवर पदाधिकार्‍यांच्या उपस्थित झाल्यानंतर दोन्हीही प्रभागात आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी निष्ठावंतासह नव्याने पक्षात आलेल्यांनीही पक्षाकडे मुलाखती दिल्या. रणधुमाळीच्या अंतिम टप्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक राजु गोरे, शिवसेनेचे शहर प्रमुख वैजनाथ देशमुख यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भाजपात शेवटच्या टप्यात आणखीन काही राजकीय पक्षातील पदाधिकार्‍यांचा होणारा समावेश पहाता भाजपा मध्ये सध्या तरी मोठ्या प्रमाणात प्रचारात कार्यकर्ते दिसत आहेत. तर संभाव्य उमेदवार असलेले प्रभागात मतदारांच्या भेटी- गाठी घेतांनाही दिसत असल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे. दोन प्रभागातील नऊ जागेसाठी मात्र पक्षाला मोठ्या प्रमाणात उमेदवारी देण्यासाठी कसरत करावी लागत असून निष्ठावंतासह नव्याने आलेल्याचांही सामना पक्षाला करावा लागून त्यांची नाराजीही दूर करण्याचा प्रयत्नही मोठया प्रमाणात करावा लागणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी