ऑफलाईन पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना योजनेत सामावून नुकसान भरपाई द्या

बळीराजा शेतकरी युवा मोर्चाची मागणी

हिमायतनगर (एनएनएल) प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांचा पीकविमा योजनेत समाविष्ट करून विमा योजनेतून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बळीराजा शेतकरी युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजना लागू करून निसर्गाच्या
चक्रव्युहामुळे खराब झालेल्या पिकांच्या नुकसानीचा मोबदला विमा कंपनीकडून मिळावे यासाठी पीकविमा भरण्याची शासनाने मुदत वाढून दिली. दरम्यान ऑनलाईन मध्ये व्यत्यय येऊ लागल्याने सेतू सुविधा केंद्रात तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांनी ऑफलाईन विमा भरला. याचा फायदा सेतुकेंद्र चालकांनी घेऊन शेतकऱ्यांची लूट केली, तरीसुद्धा शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले. मात्र ऑफलाईन अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची अजूनही कोणतीच दाखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी चिंताग्रस्त बनले आहे. तसेच अल्प पावसामुळे पिके नुकसानीत आलेले शेतकरी अडचणीत आले असताना आता कापसावर विविध रोगाने आक्रमण केले. त्यामुळे कापूस नुकसानीत आला असून, या गर्तेतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी ऑफलाईन रास्तव दाखल केलेल्या शेतकऱ्यांना योजनेत सामावरून घेण्यात यावे. आणि नुकसानीत आलेल्या पिकांचे पंचनामे करून प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून मदतीचा हक्क मिळून द्यावा अशी मागणी बळीराजा युवा मोर्च्याच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार याना देण्यात आले असून, यावर प्रल्हाद भाटे, पवन करेवाड, राहुलवाड खडकी, संदीप बलपेलवाड, रवी घुंगरे, राजू गडमवार, राजू सुर्यवंशी, समाधान मैकलवाड, राहुल हनवते, रितेश नरवाडे, समाधान घुंगरे आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी